दंगल घडवणार्‍या नेत्यांना जिवंत जाळले पाहिजे - राजभर


लखनऊः सुहेलदेव बहुजन समाज पक्षाचे अध्यक्ष ओपी राजभर यांनी जातीय दंगलीत फक्त सामान्य लोकांचाच मृत्यू का होतो ? राजकीय नेत्यांचा का नाही ? असे प्रश्‍न विचारले असून त्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अलीगडमधील एका सभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. या वेळी त्यांनी दंगलीत नेते का मरत नाहीत, असा प्रश्‍न उपस्थित केला.

‘हिंदू- मुस्लिम दंगलीत एखाद्या मोठ्या राजकीय नेत्याचा कधी मृत्यू झाला का? राजकीय नेत्यांचा मृत्यू का होत नाही? धर्माच्या आधारे भांडणे लावत फूट पाडण्याचा प्रयत्न करणार्‍या राजकीय नेत्यांना जिवंत जाळले पाहिजे. त्यानंतरच त्यांना कळेल आणि इतरांना ‘जाळणे’ बंद करतील’, अशा शब्दांत त्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. उत्तर प्रदेशात नेहमीच भाजप सरकारवर टीका करणार्‍या राजभर यांनी पुढे म्हटले आहे, की नेते हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडतात. शनिवारी राजभर यांनी एनडीएमधून बाहेर पडण्याची धमकी दिली होती. राजभर यांची ही धमकी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने 2019 मध्ये भाजपचा पराभव करण्यासाठी आघाडी केल्यानंतर आली आहे. निवडणूक एकत्रित लढवायची आहे, की नाही याचा विचार करण्यासाठी राजभर यांनी भाजपला वेळ दिला आहे. जर भाजपकडून वेळेत उत्तर आले नाही, तर आपला पक्ष सर्व 80 जागांवर निवडणूक लढवेल असे त्यांनी म्हटले आहे. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget