Breaking News

एसटीच्या चाकाखाली येऊन विद्यार्थिनी ठार


कोल्हापूर/ प्रतिनिधीः वडिलांसमोर मुलीचा अपघात होऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी गावात घडली. विद्यार्थिनी तिच्या वडिलांसोबत बाईकवर घरी येत असताना हा अपघात झाला आहे. प्रियांका पवार असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. 

प्रियंका तिच्या वडिलांसोबत बाईकवर घरी येत होती. या वेळी बाईक घसरली आणि प्रियांका खाली पडली; पण त्याचवेळी मागून येणार्‍या एसटीने प्रियांका चिरडली गेली. त्यात एसटीचे चाक डोक्यावरून गेल्यामुळे प्रियांकाचा जागीच मृत्यू झाला आहे. बाईक घसरून झालेल्या अपघातामध्ये प्रियांकाचे वडील किरकोळ जखमी झाले आहेत. एसटीखाली चिरडल्यामुळे परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते; पण पोलिस आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. आपल्या पोटच्या गोळ्याचा डोळ्यासमोर जीव जाताना पाहून प्रियांकाच्या वडिलांना मोठा धक्का बसला आहे.