Breaking News

संभाजी ब्रिगेड आगामी जालना लोकसभा निवडणूक लढवणार; दानवेंना आव्हान


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना संभाजी ब्रिगेडने आव्हान दिले आहे. संभाजी ब्रिगेडने आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज जालन्यातील मधुबन हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या परिषदेत संभाजी ब्रिगेड आगामी जालना लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष तुळशीराम चंद यांनी केली आहे.

'शेतकरी, व्यापारी आणि तरुणांना उद्धवस्त करण्याचं काम या भाजप सरकारनं केलं आहे', अशी टीका यावेळी त्यांनी केली.