Breaking News

भारिपच्या भिंगार युवक शहराध्यक्षपदी अक्षय गायकवाडअहमदनगर/प्रतिनिधी

भारिप बहुजन महासंघाच्या भिंगार युवक शहराध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते अक्षय गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. तर भिंगारच्या अनेक युवा कार्यकर्त्यांनी भारिपमध्ये प्रवेश केला. शहर जिल्हा महासचिव सुनिल शिंदे व जिल्हा उपाध्यक्ष विनोद गायकवाड यांनी अक्षय गायकवाड यांना नियुक्ती पत्र देऊन युवकांचे पक्षात स्वागत केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक सोनवणे यांनी युवकांना समाजाच्या वंचित घटकांचे प्रश्‍न सोडविण्यास आवाहन केले. यावेळी भिंगार शहराध्यक्ष सागर चाबुकस्वार, अमोल भिंगारदिवे, जीवन कांबळे, दिपक पाटोळे, फिरोज पठाण, संदेश भिंगारदिवे, शोन भिंगारदिवे, रोहित भिंगारदिवे, हर्षद वाघमारे, महेश शिंदे, ऋषीकेश गायकवाड, सनी भिंगारदिवे, निखील मेढे, धीरज उबाळे, अभिषेक शिंदे, अनिकेत मेढे, भैय्या बोराडे, विजय पवार, अभिषेक शेलार, अविनाश शेलार, गणेश भिंगारदिवे, सिध्दार्थ थोरात, विशाल केदारे आदिंसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सुनिल शिंदे म्हणाले की, पुरोगामी विचाराने सर्व समाजाला बरोबर घेऊन भारिप कार्य करीत आहे. जातीयवादी शक्तींना थोपविण्याचे काम केले जात असून, यासाठी युवकांना जागृत व संघटित केले जात आहे. सर्वसामान्यांचे प्रश्‍न युवा शक्तीच्या दबावाने सुटणार असून, यासाठी युवकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अक्षय गायकवाड यांनी मिळालेल्या पदाच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहणार असल्याचे स्पष्ट केले.