Breaking News

जेफ बेजॉस चा घटस्फोट ठरणार जगातील सर्वात महागडा

जेफ बेजॉस साठी इमेज परिणाम

वॉशिंग्टन : अ‍ॅमेझॉन या ई-कॉमर्स कंपनीतून स्वस्तात उत्पादने विकण्यासाठी धडपडणार्‍या कंपनीच्या मालकाला पत्नीबरोबरील घटस्फोट चांगलाच महागात पडणार आहे. अ‍ॅमेझॉनचा मालक जेफ बेजॉस हा पत्नीला घटस्फोट देणार आहे. या घटस्फोटासाठी पत्नीला देणारी रक्कम त्याच्या संपत्तीची निम्मी म्हणजे सुमारे 5 हजार अब्ज रुपये असणार आहे. यामुळे जगातील सर्वात श्रीमंत असलेला मानही जेफ गमविणार असल्याचे चित्र दिसत आहे.

बेजॉस याने पत्नी मॅकेन्झीला घटस्फोट देणार असल्याचे 9 जानेवारीला ट्विटरवरुन जाहीर केले. यामध्ये त्याने म्हटले आहे, की आमचे मित्र आणि जवळच्या व्यक्तींना माहित आहे, आम्ही दोघे पती-पत्नी दीर्घकाळापासून प्रायोगिक तत्वावर विभक्त राहत आहोत. आम्ही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. तरी आम्ही मित्र म्हणून कायम राहणार आहोत. आम्ही अनेक वर्ष एकत्रित राहिल्याने एकमेकांना भाग्यवान समजत आहोत आणि सर्वांसाठी कृतज्ञ आहोत. दाम्पत्य म्हणून आमचे आयुष्य खूप चांगले आहे. तसेच पालक, मित्र भागीदार म्हणून विविध प्रकल्प आणि रोमांचकारप्रसंगी पुढेही चांगले भविष्य आहे. नावे वेगळी झाली तर आम्ही कुटुंब म्हणून जवळचे मित्र एक राहणार आहोत. दोघांच्यावतीने प्रसिद्ध केलेल्या पत्रानंतर जगातील सर्वात महागडा घटस्फोट ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही वर्षापूर्वी मायक्रोस्फॉटचे संस्थापक बिल गेट्स हे जगातील सर्वात श्रीमंत होते. मात्र अ‍ॅमेझॉनद्वारे जेफने जगभरात विक्रीचे जाळे निर्माण करुन गेट्स यांना श्रीमंतीत मागे टाकले होते.