Breaking News

सासुर्वेमध्ये लाकडी दांडक्याने मारहाण


रहिमतपूर (प्रतिनिधी) : लाईट बील भरण्याच्या कारणावरुन (सासुर्वे ता. कोरेगाव) येथे लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची तक्रार इकबाल उमर मुजावर (वय 32) यांनी रहिमतपूर पोलीस स्टेशनला दाखल केली आहे. त्यानुसार अहमद बाबू मुलाणी (वय 45), सूरज अहमद मुलाणी (वय 30) या त्याच गावातील बाप लेकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सासुर्वे येथील इकबाल उमर मुलाणी हे लाईट बिल मागण्यासाठी अहमद मुलाणी यांच्याकडे गेले होते. तेव्हा तू लाईट बील भरु नकोस, आमचे आम्ही बघतो, असे त्यांनी सांगितले. त्याच वेळी त्यांचा मुलगा सूरज मुलाणी याने पाठीमागून येऊन जीवे मारण्याच्या उद्देशाने लाकडी दांडके त्याच्या डोक्यात घातले, तसेच शिवीगाळही केली. या मारहाणीवरून इक्बाल मुजावर यांनी रहिमतपूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सपोनि घनशाम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कापले करीत आहेत.