Breaking News

पुसेगावमध्ये आज व्हॉलिबॉल स्पर्धा; राष्ट्रीय खेळाडू


पुसेगाव(प्रतिनिधी) : परमपूज्य श्री सेवागिरी महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त भरणार्‍या यात्रेत मंगळवारी (दि. एक जानेवारी) व बुधवार ( दि. दोन) रोजी दिवसरात्र अखिल भारतीय व्हॉलिबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्ली, हरियाणा, मध्यप्रदेश, राजस्थान,उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा व कर्नाटकसह महाराष्ट्रातील राष्ट्रीय खेळाडूंच्या संघानी या स्पर्धेसाठी सहभाग नोंदवला असल्याने चुरशीच्या स्पर्धा पाहण्याची संधी व्हॉलीबॉल शौकिनांना मिळणार आहे. या स्पर्धा व्हॉलिबॉल फेडरेशन व राज्य असोशिएशनच्या मान्यतेनुसार व नियमानुसार खेळविण्यात येणार आहेत.

येथील हनुमानगिरी हायस्कुलच्या प्रांगणात त्यासाठी दोन मैदाने तयार करण्यात येत आहेत. दिवसरात्र खेळविण्यात येणार्‍या या स्पर्धेसाठी स्वतंत्र व भरपूर प्रकाश व्यवस्था करण्यात आली असून शौकिनांना स्पर्धेचा मनमुराद आनंद घेता यावा यासाठी मैदानाच्या चारही बाजूंना गॅलरीची सोय करण्यात येत आहे. करसिंग व लकी ( पंजाब ), सुरेशकुमार ( हरियाणा ), अरुणकुमार शर्मा व निट्टू ( उत्तर प्रेश ), ज्युनिअर बिटूटू व सुरेंद्रकुमार ( राजस्थान ) या राष्ट्रीय खेळाडूंच्या संघांबरोबरच महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, मालेगाव, नाशिक, सोलापूर, सांगली, मालेगाव, जामनेर, सिंधुदूर्ग, नगर, सातारा, जळगाव, जालना, कोल्हापूर, रायगड, विदर्भ व उस्मानाबाद येथील नामवंत राष्ट्रीय खेळाडूंचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. या स्पर्धेतील पहिल्या पाच विजेत्या संघांना अनुक्रमे 25,000 रुपये, 15,000 हजार रुपये, 10,000 हजार रुपये, 5000 रुपये व 2000 रुपयांची बक्षिसे व चषक देण्यात येणार असल्याचे सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी सांगितले.