Breaking News

जितेंद्र कायस्थ यांच्या उपोषणाची यशस्वी सांगता


बुलडाणा,(प्रतिनिधी): बुलडाणा अर्बन को ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी मधील सुरु असलेल्या गैरव्यवहारांना तसेच कर्मचारी वर्गाच्या न्याय हक्कांच्या मागणीसाठी गेल्या 10 दिवसांपासून सिटी न्यूज बुलडाणाचे संपादक जितेंद्र कायस्थ यांनी सुरु केलेल्या उपोषणाची दिनांक 16 जानेवारी रोजी यशस्वी सांगता झाली. यामध्ये मुख्य मुद्दे लक्षात घेता कर्मचार्‍यांना संघटना स्थापना करू देणे तसेच त्यांच्या पगारात वाढ होणे हे होते.

 दरम्यान या बाबींचा विचार करत प्रभारी जिल्हा उपनिबंधक कृपलानी यांनी सदर पतसंस्थेला 7 दिवसांच्या आत सदर मुद्यांवर कार्यवाही करण्याचे पत्र दिले. शिवाय याच पतसंस्थेची सहकार कायदा 2002 नुसार कलम 108 ची चौकशी लागली असून स्वतः जिल्हाधिकारी यांनी सुद्धा सहकार आयुक्त यांना तपासणी नि:पक्ष व्हावी याकरिता पत्रव्यवहार केला. दरम्यान महाराष्ट्रातील ज्या पतसंस्थामध्ये सुरु असलेले गैरव्यवहार तसेच भ्रष्ट्राचाराला एकप्रकारे आळा जरूर बसेल अशी अपेक्षा या कार्यवाहीद्वारे दिसून येत आहे.