Breaking News

विज कंपनीच्या कर्मचार्‍यांचा लाक्षणिक संप
बीड/परळी(प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या चारही कंपन्यातील ८६ हजार विज कामगार व अभियंते यांच्या सहा कामगार संघटनांनी कृती समिती निर्माण करुन संप पुकारला आहे. बीड जिल्ह्यातील विज कंपनीतील कर्मचार्‍यांनीही आज ठिकठिकाणी संप पुकारुन कार्यालयासमोर ठिय्या मांडला आहे. परळी येथील कृती समितीच्या नेतृत्वात शेकडो कर्मचार्‍यांनी लाक्षणिक संप सुरु केला आहे.
महाराष्ट्र राज्य विघुत मडंळाच्या चारही कंपन्यातील ८६००० विज कामगार व अभिंयते यांच्या सहा कामगार सघंटनानी कृती समिती निर्माण करुन हा संप पुकारलेला असुन सद्या विघुत मडंळाच्या विभाजीत कंपन्यात मोठया प्रमाणात खाजगी भाडंवलदार याचा समावेश करण्यात आलेला आहे.सुरुवातीला महानिर्मितीचे क्षेत्र विज निर्मितीसाठी खाजगी भाडंवलदाराना खुले केले.याचा परिणाम असा झाला कि आज महानिर्मिती कंपनीस आपले संच बंद करावे लागत आहे.कारण महाराष्ट्र राज्याला जेवढया विजेची गरज आहे.त्यापेक्षा जास्त विजेचे उत्पादन होत आहे.म्हणून सरकारच्या मालकीच्या विज निर्मिती संचास कधी कोळसा नाही तर कधी पाणी नाही असे विविध कारणे पुढे करुन खाजगी मालकाची विज विकत घेण्यासाठी बंद ठेवण्यात येत आहे. सरकारच्या मालकिचे जलविघुत प्रकल्प हे महानिर्मिती कंपनीच्या ताब्यात आहेत जे संच सर्वात कमी दराने विज निर्मिती करत आहे.ते संच महानिर्मिती कडून सरकार परत घेवुन खाजगी भाडवंलदाना विकण्याचा कट करत त्यास आमचा विरोध आहे तसेच औष्णिक विघुत केंद्रे २१० मेगावाट सुधा बंद करण्यात येत आहे.यास कृती समितीचा विरोध आहे. त्यामुळेच परळीसह बीड आणि इतर ठिकाणच्या कर्मचार्‍यांनी संप पुकारुन कार्यालयासमोर निदर्शने केली.