Breaking News

मार्केट यार्डमध्ये हापूस आंबा दाखल

हापूस आंबा साठी इमेज परिणाम

पुणे : हापूस आंब्याला बाजारात मोठी मागणी असते. यंदाच्या मोसमातील पहिला कर्नाटकचा हापूस आंबा पुण्याच्या मार्केटयार्डमध्ये दाखल झाला आहे.मार्केटयार्डमधील व्यापारी रोहन उरसळे यांच्याकडे या आंब्याची 20 डझन इतकी आवक झाली आहे. या आंब्याला प्रति डझन 700 ते 800 रुपये इतका भाव आहे. 15 दिवस आधीच हा आंबा बाजारात दाखल झाला आहे. याशिवाय बदाम, सुंदरी, लालबाग या जातीचे आंबेही बाजारात दाखल झाले आहेत.