Breaking News

विरोधकांनी लोकसभेसाठी बारामतीहुन उमेदवार आयात करावा-पंकजाताई मुंडेअंबेजोगाई (प्रतिनिधी ) बीड लोकसभेची निवडणुका कधीही होवो भाजप त्यासाठी सदैव तयार आहे उमेदवारीबद्दल कुठेही पक्षात शंका नाही विद्यमान खासदार डॉ. प्रीतम ताई मुंडे लोकसभेच्या उमेदवार आहेत विरोधकाकडे उमेदवार नसेल तर त्यांनी बारामतीहून उमेदवार आयात करावा असा उपरोधिक टोला पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी राष्ट्रवादीला लगावला अलीकडे पालकमंत्र्यांच्या आक्रमक हल्ल्यापुढे राष्ट्रवादी बॅकफूटवर आल्याचे चित्र दिसत आहे

अंबेजोगाई येथे एका पंचतारांकित हॉटेलच्या उद्घाटनांसाठी पालकमंत्री आल्या असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्या म्हणाल्या की लातूरला पक्षाध्यक्ष अमित शहा यांची सभा झाली जनतेची उत्स्फूर्त उपस्थिती पाहून मराठवाड्यातील जनता भाजपाच्या पाठीशी असल्याची साक्ष पटते मात्र आमचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेशी युती व्हावी असेच तमाम भाजपाच्या माझ्यासह नेत्यांना वाटते आमचा नाईलाज आहे बीडला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे खासदार प्रीतम ताई मुंडे यांची उमेदवारी जाहीर करायला आले नव्हते पत्रकारांशी बोलताना एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले की प्रीतमताई मुंडे यांची उमेदवारी जाहीर करण्याचा प्रश्नच नाही त्या जाहीर उमेदवार आहेत विरोधकाकडून कोण उमेदवार द्यावा यावर एकमत होत नाही कोणीही आपला राजकीय बळी द्यायला तयार नाही जिल्ह्यात कोणीच उमेदवार नसेल तर बारामतीहून उमेदवार आयात केला. तरी जिल्ह्यातील जनता खासदार प्रीतमताई मुंडे सोबतच असल्याची आम्हाला विजयाची खात्री आहे.

असेही पालकमंत्री मुंडे म्हणाल्या
विरोधी उमेदवार सक्षम नसल्याने निवडणूक एकतर्फी होईल का? या प्रश्‍नाचे उत्तर देताना पंकजाताई मुंडे म्हणतात की जिल्ह्यात कोणतीच निवडणूक एकतर्फी होत नाही मात्र खासदार प्रीतमताई मुंडे यांनी गेली पाच वर्षात केलेली कामे तसेच स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांनी जिल्ह्यासाठी आणलेला प्रचंड निधी याची तुलना शेजारच्या नांदेड ,लातूर जिल्ह्याचे दोन्ही सुपुत्र मुख्यमंत्री होते तरीही बीड जिल्ह्या एवढा निधी व विकास कामे आणु शकलेले नाहीत महाराष्ट्रात सर्वाधिक जागा भाजपाच्या येणार आहेत मुंडे साहेबांनी रेल्वे आणण्याचा संकल्प केला होता त्याची पूर्तता लोकसभा निवडणुकी अगोदर होईल याचा आपल्याला विश्वास वाटतो यापूर्वी जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचा सर्वे सुद्धा नव्हता आजच्या घडीला जिल्ह्यातील एकही तालुका असा नाही की राष्ट्रीय महामार्गाला जोडला गेलेला नाही जिल्ह्यात पाच राष्ट्रवादीचे आमदार होते किती किलोमीटर रस्त्याची कामे झाली ? आम्ही दोघी बहिणीनी विकास कामासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो की केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांच्याकडे प्रस्ताव दिले दोघा भावांनी मंजुरी दिल्याने आम्ही विकास करू शकलो. बीड जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातून खासदार प्रीतम ताई मुंडे यांना बहुमत मिळेल असा विश्वास वाटतो कॉंग्रेस,राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची आघाडी आपले मताधिक्य किती कमी