Breaking News

इंद्रा नुयी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत


नवी दिल्ली : पेप्सीको कंपनीच्या माजी कार्यकारी अधिकारी इंद्रा नूयी यांच्या हाती जागतिक बँकेची कमान सोपवण्यात येऊ शकते. जागतिक बँकेच्या प्रशासनाने या बद्दलचा एक निर्णय घेतला आहे. इंद्रा नूयी सोबतच आणखीन 2 व्यक्तीं जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहे. 


जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम-यूंग-किम हे 1 फेब्रुवारीला निवृत्त होणार आहेत. त्यासाठी जागतिक बँकेने ही यादी प्रसिद्ध केली आहे. इंद्रा नूयी यांनी मागच्याच वर्षी ऑक्टोंबर महिन्यामध्ये पेप्सीको कंपनीच्या कार्यकारी अधिकारी या पदावरून राजीनामा दिला होता. किम यांनी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदावरून अचानक राजीनामा देण्याचे जाहीर केल्यामुळे ट्रम्प प्रशासनाने नवीन अध्यक्ष नेमण्याचे ठरवले होते. नूयी व्यतीरिक्त जागतिक बँकेच्या नव्या अध्यक्ष पदाच्या यादीमध्ये, अमेरिकेचे अर्थशास्त्रज्ञ डेविड मालपास आणि ओव्हरसीस प्राईव्हेट इन्व्हेस्टमेंट कंपनीचे कार्यकारी अधिकारी रे वाशबर्न यांचाही समावेश आहे. किम हे 1 फेब्रुवारीला जागतिक बँकेच्या अध्यक्ष पदावरून राजीनामा देणार आहेत. त्यांनी एका खासगी कंपनीसाठी काम करण्याचे ठरवल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. ते 2022मध्ये जागतिक बँकेच्या अध्यक्ष पदावरून औपचारीकरित्या निवृत्त होणार होते. नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प हिने विशेष सहभाग घेतला होता.