Breaking News

इमामपूर ग्रामपंचायत गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करा ः ग्रामस्थ


नगर/प्रतिनिधी

नगर तालुक्यातील इमामपूर ग्रामपंचायतीत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा. या मागणीसाठी इमामपुरच्या ग्रामस्थांनी दि.31 रोजी दुपारी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने यांच्या कार्यालयातच घोषणाबाजी करत उपोषण सुरु केले आहे. इमामपूर येथील गणेश आवारे, ईश्‍वर जरे, उद्धव मोकाटे, आबा मोकाटे, सोमनाथ टिमकरे, दामोधर आवारे, भाऊसाहेब साळवे, विजय आवारे, विजय वाणी, मारुती मोकाटे, पांडुरंग पाटोळे, दादू मेजर,रामभाऊ जरे, प्रशांत जरे, सखाराम टिमकरे यांच्यासह ग्रामस्थांनी हे आंदोलन सुरु केले आहे.

याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने यांना शनिवारी दि.29 निवेदन दिले होते. नगर तालुक्यातील इमामपुर येथील ग्रामपंचायतीच्यावतीने केलेल्या 14 व्या वित्त आयोगातील कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व अनियमितता झालेली असुन गावातील राधाकिसन बाबुराव आवारे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन झालेल्या चौकशीत ते सिध्द झालेले आहे. तसा तपासणी अहवाल जिल्हा परिषदेला प्राप्त झालेला आहे. त्या अहवालामध्ये दोषी असलेल्या सरपंच व ग्रामसेवक, ग्रामपंचायत इमामपुर तसेच अधिकारी यांचेवर जोपर्यंत फौजदारी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही सर्व ग्रामस्थ दि.31 पासून जिल्हा परिषदसमोर आमरण उपोषण करणार आहोत. असे ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.