Breaking News

शीख दंगलीवरून मोदींचा काँग्रेसवर निशाणा


नवीदिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शीख धर्मगुरू गुरूगोविंद सिंग यांच्या 350 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृती जपणारे 350 रुपयांचे नाणे चलनात आणले. या वेळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि माजी सरन्यायाधीश जे.एस. खेहरही उपस्थित होते. या वेळी पंतप्रधान मोदींनी शीख दंगलीचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसवर टीका केली. 

शीख गुरूंनी दाखवलेल्या न्यायाच्या मार्गावर चालत केंद्र सरकार 1984च्या दंगलीतील पीडितांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच गुरूनानक यांच्या भक्तांना आता दुर्बिणीने दर्शन घेण्याची गरज पडणार नाही. 1947ला झालेली चूक आम्ही सुधारली आहे. शीख समाजाचे तीर्थक्षेत्र काही किलोमीटरवर होत; पण आता तसे होणार नाही. कारण कर्तारपूर कॉरिडोरचे काम सरकारने हाती घेतले आहे, असे मोदी म्हणाले.