Breaking News

जनसंपर्क अभियानाच्या निमित्ताने मतदार संघ ढवळुन काढा : आ.बोंद्रे


चिखली,(प्रतिनिधी): चिखली विधानसभा मतदार संघात अर्ध्यापेक्षा अधिक जिल्हा परिषद मतदार संघात जनसंपर्क यात्रेला उत्तम प्रतिसाद मिळाल्याने जनसामान्यांशी चांगल्या प्रकारे संवाद साधल्या गेला. आता दुसर्‍या टप्यात मतदार संघातील उर्वरीत चार जिल्हा परिषद सर्कलमध्ये जनसंपर्क यात्रा निघणार आहे.

या यात्रेसाठी पुर्व तयारी म्हणुन नागरीकांना यात्रेच्या कार्यक्रमाच्या सभाव्य तारखेची माहिती देण्याबरोबरच यात्रेत ठिकठिकाणी काँगे्रस पक्षाबरोबरच काँगे्रस पक्षाचे विविध सेल आणि महिला काँगे्रसच्या शाखा स्थापन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहीजे.

नागरीकांशी संवाद साधून त्यांच्या भावना समजून घेतांना काँगे्रस पक्षाची भूमिका त्यांचेपर्यंत पोहचविण्यासाठी जास्तीत जास्त नागरीक या जनसंपर्क यात्रेत सहभागी होतील, यासाठी आतापासुनच मेहनत घ्यावी, अशी अपेक्षा जिल्हा काँगे्रसचे अध्यक्ष तथा आमदार राहुल बोंद्रे यांनी चिखली काँगे्रसच्या विस्तारीत बैठकीत बोलतांना काढले.

चिखली काँगे्रसची विस्तारीत कार्यकारणीची बैठक चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात 8 जानेवारी रोजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीसाठी चिखली काँगे्रसच्या सर्व कार्यकारणी पदाधिकार्‍यांसह, शहर काँगे्रस, युवक काँगे्रस, सेवादल, एन.एस.यु.आय. डॉक्टर सेल, सहकार सेल, महिला काँगे्रस, मागासवर्गीय सेल, विधी सेल, ओबीसी सेल, शेतकरी शेल, अल्पसंख्याक सेल, सोशल मिडीया, आदी फ्रंटलचे प्रमुख पदाधिकारी हजर होते. सदर बैठकीत विविध फ्रंटलच्या सुरू असलेल्या कामांबध्दल सविस्तर चर्चा होवून ज्या ठिकाणी या विभागाच्या शाखा नाहीत, त्या ठिकाणी जनसंपर्क यात्रेच्या माध्यमातुन शाखा स्थापना करण्यात पुढकार घेण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीत सध्या सोशल मिडीयाच्या माध्यमातुन सुरू असलेल्या पक्ष विरोधी कारवायांवर लक्ष ठेवुन त्याला जसास तसे उत्तर देण्यासाठी पक्षातर्फे सुरू असलेल्या सोशल मिडीया सेलच्या ग्रृपमध्ये सामील होवुन सुरू असलेल्या खोडसाळ प्रकाराला उत्तर देण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घेवुन पक्षाच्या सोशल मिडीयाची व्याप्ती वाढविण्याचे व या माध्यमाचा उपयोग करून पक्षसंघटन मजबूत करण्याचे ठरविण्यात आले. परीसरात पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले, या बाबीची तत्काळ दाखल घेवुन आमदार बोंद्रे यांनी जिल्हाधिकारी यांचेशी संपर्क साधून व निवेदन देवुन शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार मदत देण्याची मागणी जिल्हा काँगे्रसच्या वतीने लावुन धरली, त्यांच्या सजग भुमीकेबध्दल चिखली काँगे्रस व शेतकरी सेलच्या वतीने त्यांचा अभिनंदनाचा ठराव बैठकीत मांडण्यात आला, त्याला सर्व उपस्थितांनी मान्यता दिली. या बैठकीत पक्ष निरीक्षक गणेशराव पाटील, बाजार समितीचे सभापती सचिन शिंगणे, तालुका अध्यक्ष विष्णु पाटील कुळसुंदर, शहर अध्यक्ष अतहरोद्यीन काझी, दिपक देशमाने, भिमराव महाराज हिवरकर, सुरेंद्र खपके, यांची समयोचित भाषने झाली. कार्यक्रमाचे प्रस्तावीक शिवनारायण म्हस्के, संचलन सुनिल पवार तर आभार प्रदर्शन गजानन परिहार यांनी केले.