Breaking News

विद्यूत ताराशी संपर्क आल्याने एकाचा मृत्यू

राहाता/प्रतिनिधी
सक्रांत सणा निमित्ताने राहाता शहरात पतंग खेळत असतांना युवकाचा मुत्यू झाल्याची घटना संध्याकाळी सहाच्या सुमारास घडली आहे. प्राप्त माहीती नुसार राहाता शहरातील शनी रोड वरील शिवदे यांच्या इमारतीवर आठ ते दहा मुले पंतग उडवत होती. 

दरम्यान तुषार चंपालाल वाडीले हा इयत्ता बाराबीत शिकणारा (वय18) हा त्या ठिकाणी होता. त्याच्या कानाला मोबाईल हेड फोन लावलेला असताना त्याला फोन कॉल आला. बोलण्यात व्यस्त असताना इमारती जवळून गेलेल्या मेन विद्यूत ताराशी संपर्क आल्याने तो चिटकला गेला. दरम्यान त्याचा मामा योगेश जगन्नाथ शिवदे (वय30) त्याला वाचवण्या करीता गेला असता तोही जखमी झाला. घटनेनंतर जवळ पासच्या लोकांनी त्याला शिर्डी येथिल सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले असता तो मयत झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या बाबत राहाता पोलिस ठाण्यात उशिरा पर्यत गुन्हा दाखल झालेला नव्हता.