जालिंदर बुधवत यांच्या हस्ते विविध विकास कामाचे लोकार्पण


बुलडाणा,(प्रतिनिधी) दांडगा जनसंपर्क आणि समस्यांची चांगली जाण यामुळे जिल्हयाचे भूमिपुत्र खा.प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनात व त्यांच्या प्रयत्नांतून मिळालेल्या निधीमुळे मासरूळ सर्कलचा विकासात्मक दर्जा उंचावला आहे असे प्रतिपादन शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी वरुड ता.बुलडाणा येथे खासदार निर्धाअंतर्गत पूर्णत्वास गेलेल्या 15 लक्ष रुपयांच्या विकास कामांचे लोकार्पन प्रसंगी जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी केले. त्यांच्या हस्ते 29 डिसेंबर रोजी विविध विकास कामाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी माजी जि.प.अध्यक्ष नरेंद्र खेडेकर, पं.स.सदस्य दिलीप सिनकर किसानसेना उपजिल्हा प्रमुख लखन गाडेकर यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते. 

मासरुळ जि.प.सर्कलमधील वरुड येथे अंगणवाडी खोली तसेच खासदार निर्धा अंतर्गत 10 लक्ष रुपयांचे संत सावता माळी सामाजिक सभागृहाचे लोकार्पन करण्यात आले. यावेळी मासरुळ येथील शनि मंदीराच्या परिसरातील सभागृहाचे भूमिपूजन पार पडले. याप्रसंगी बुधवत म्हणाले की, शिवसेना ही संकट काळात धावून जाणारी संघटना आहे. विकास कामातही नियोजनपूर्वक आणि झपाट्याने पूर्णत्वास जाणार्‍या कामांचा आदर्श मासरुळ जि.प.सर्कलमध्ये उभा राहीला असल्याचेही त्यांनी सांगीतले. यावेळी उपतालुका प्रमुख गजानन टेकाळे, शेषराव सावळे वरुडचे सरपंच रमेश गोरे, रवि गोरे, मासरुळ सरपंच सौ. रंजना सिनकर, विभाग प्रमुख गजानन धंदर, श्रीराम गोरे, विलास भगत, मधुकर महाले, संभाजी देशमुख, मधुकर सिनकर, कडुबा घुले, बाळू सपकाळ, दिलीप माळोदे, विजय गाढवे, प्रकाश नरवाडे, किरण उगले, दादाराव भिंगारे, विजय गायकी, दादाराव कासोदे, भास्करराव देशमुख, दगडुबा अंबेकर, तयराम वाघ, बबलू वाघुर्डे, गणेश गुजर, अनिल कानडजे, पांडुरंग मोरे, दिनेश काळे, गणेश पालकर, राजु पालकर, रफीक शहा, रामेश्‍वर शिंदे, सुनिल पडोळ, कृष्णा पडोळ, शाकीर जमादार, अंकुश डुकरे, श्रावण ब्राम्हणे, अरुन काळे, भागवत सपकाळ, गजानन गोरे, कमलाकर उबाळे, मधु काळे, सुरेश भिवसनकर, मुकुंदा काळे,विष्णु गोरे, अनंता कारजकर, पंडीत राऊत, डिगांवर राऊत यांचेसह वरुड ,सोयगांव, मासरुळ, तराडखेड व शेकापूर येथील शिवसैनिक तसेच गावकरी उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget