Breaking News

कन्या विद्या मंदिर चित्रकला परीक्षेचा निकाल शंभर टक्के


कोपरगाव/प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन कला संचलनालय मुंबई मार्फत घेन्यात येणार्‍या शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा इलेमेंटरी व इंटरमिजीएट परीक्षा 2018 चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या परीक्षेत अ श्रेणी मध्ये एकुण 5 विद्यार्थीनी ब श्रेणी मध्ये 18 विद्यार्थीनी व क श्रेणी मध्ये 50 विद्यार्थीनी यांनी यश संपादन केले.

अ श्रेणी मध्ये विशेष प्राविन्यसह सहाणे श्रृतिका, उदावंत श्रेया, चौधरी संजना, दवंगे तन्वी, पाळेकर वैष्णवी तसेच ब श्रेणी मध्ये वायकर साक्षी, पंडोरे अनुष्का, टपाल अमृता , खर्डे सोनाली, जंगम सृष्टी, हारणे मयुरी, भुजबळ ऋतुजा, शेलार पुजा, शिंदे रेनुका, सांगळे अमृता, सातव प्राजक्ता, निकम वैष्णवी, नाईकवाडे दिक्षा, लभडे श्रेया, कुलकर्णी शिवानी, गऊल साक्षी, गाडे धनश्री, देव मधुरा आदी विद्यार्थीनीनीं यश संपादन केले. या विद्यार्थिनींना कला शिक्षक निळकंठ प्रविण व निर्मळ अमोल यांचे मार्गदर्शन लाभले. सदर विद्यार्थिनीचे स्थानिक स्कुल कमिटी व सल्लागार समिती सदस्य, प्रा. मंजुषा सुरवसे, उपमुख्याध्यापक अशोक जेजुरकर, पर्यवेक्षक मंगला राजेभोसले व शशिकांत दहिफळे अभिनंदन करण्यात आले.