Breaking News

एफआरपीनुसार उसबिलांसाठी ‘स्वाभिमानी’चे आंदोलन


रहिमतपूर (प्रतिनिधी) : ऊसउत्पादकांना एफआरपीची रक्कम विहित कालमर्यादेत तात्काळ अदा करण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांच्या नेतृत्वाखाली सहयाद्रि, जरंडेश्‍वर, वर्धन अ‍ॅग्रो, जयवंत शुगर, ग्रीन पॉवर गोपूज या कारखान्यांच्या येथील कार्यालयावर आंदोलन करून गटकार्यालयांना टाळे ठोकण्यात आले.
 
यावेळी सचिन साळुंखे म्हणाले, कारखाने सुरु होऊन 50 दिवस झाले तरीही ऊसउत्पादकांना पैसे मिळालेले नाहीत. साखर आयुक्तांच्या आदेशानुसार चालू हंगामामध्ये ऊसबिलापोटी 14 दिवसात एफआरपीप्रमाणे होणारी किंमत ऊस उत्पादक शेतकर्यांना अदा करणे बंधनकारक आहे. तसेच विहित कालावधीत एफआरपी देयके आदा न केल्यास विलंब कालावधीकरिता 15 टक्के व्याज आकारणी करून रक्कम देणे बंधनकारक आहे. तरीही जिल्हयातील जरंडेश्‍वर, जयवंत शुगर या कारखान्यांनी 2200 ते 2400 रुपयांप्रमाणे पैसे जमा केले आहेत. त्यातून शेतकर्‍यांची सोसायटी कर्ज भरले जात नाही. एफआरपीप्रमाणेे ऊस उत्पादक शेतकार्‍यांना पैसे मिळत नाही तोपर्यंत शेतकरी संघटना कारखान्यांची कार्यालये सुरू होऊन देणार नाही. याबाबत कारखान्यांनी आजतागायत तसेच यापुढेही गाळप केलेल्या ऊसाचे एफआरपीप्रमाणे ऊस देयके संमंधित ऊस उत्पादक शेतकर्यांना विहीत मुदतीत अदा करावीत अशा आशयाचे निवेदण देण्यात आले आहे. आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष सचिनकुमार नलवडे, पक्षाध्यक्ष शंकर शिंदे, अलिभाई इनामदार, श्रीकांत लावंड, अनिल गर्हाळ, विक्रम निकम, आप्पासो पवार, शंकर कणसे, अनंत माने, दादा पवार, राजेश घाडगे, शंकर भोसले, गुरूबाळ बिराजदार, विष्णू भोसले, शंकर चव्हाण, राजेंद्र भोसले, चंद्रकांत गायकवाड, नंदकुमार भोसले, धनाजी चव्हाण, राजेंद्र सपकाळ, रोहित निकम तसेच शेतकरी उपस्थित होते.