Breaking News

पाडळी येथे बारावी परीक्षा केंद्रास परवानगी


( समीर शेख )
जामखेड ता.प्रतिनीधी -जामखेड तालुक्यातील पाडळी येथील स्व.एम्.ई.भोरे ज्युनिअर काँलेजला नुकतीच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे विभागाची बारावी च्या बोर्ड परीक्षेस परवानगी मिळाली असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.डॉ श्री संजय भोरे यांनी दिली असुन पाडळी येथे ज्युनिअर काँलेजची स्थापना २००८-०९ या शैक्षणिक वर्षी झाली होती.

 तेव्हा पासुन बारावी च्या विद्यार्थ्यांना खर्डा येथे २८कि.मी.दुर अंतरावर जावे लागत होते. त्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा वेळ व पालकांचा पैसा खर्च होत होता. त्यामुळे या परिसरातील विद्यार्थी व पालकांची खूप दिवसांची परीक्षा केंद्र पाडळी येथे सुरु करण्याची मागणी होती.संस्थेने बांधलेली अद्यावत इमारत व पुरेशा भौतिक सुविधा उपलब्ध केल्याने व त्याचा पाठपुरावा केल्याने त्यास पुणे बोर्डाने बारावी परीक्षा केंद्रास परवानगी दिली.

याचा फायदा परिसरातील नान्नज,जवळा,फक्राबाद,खांडवी, घोडेगाव, पिंपळगाव उंडा,कुसडगाव,पाडळी, खुरदैठण,डिसलेवाडी,झिक्री,भोगलवाडी,सरदवाडी,पिंपळगाव आवळा, आपटी,येथील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होणार आहे.