Breaking News

पोदार स्कूलमध्ये वाषिंक क्रीडादिन साजरासातारा,  (प्रतिनिधी) : प्रचंड उत्साह, उत्सुकता आणि जल्लोषाच्या वातावरणात येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये विविध क्रीडास्पर्धा, नेत्रदीपक नृत्ये, लेझिम, तालवादये यांच्याबरोबरीने सामाजिक संदेश देणार्‍या प्रात्यक्षिकांच्या उत्साहपूर्ण वातावरणात नुकताच विद्यालयाचा नववा वार्षिक क्रीडादिन साजरा झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संतोष वसंत धोत्र, रजनी प्रभुदेसाई, प्रशांत वाघ, अमजद बागवान, वर्षा गुप्ता यांची विशेष उपस्थिती होती.

पोदार स्कुलमधील वार्षिक क्रीडादिनासाठी इयत्ता पहिली ते इ.12 वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी जोरात सराव केला होता. त्यामुळे मुख्य कार्यक्रमाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. त्यामुळे हा प्रत्यक्ष सोहळा अतिशय नियोजनबध्द व दिमाखदार ठरला. त्यात विद्यार्थ्यांनी विविधतेत एकता, मानवता, बंधूभाव, मुलगी वाचवा, पाण्याचे महत्त्व, आपले आरोग्य व आरोग्यवर्धक आहार अशी सामाजिक मूल्ये जपण्याचा संदेश देणारी विविध नृत्ये व कवायती सादर केल्या. विदयार्थ्यांच्या विविध क्रीडा प्रकारातील प्रत्यक्ष स्पर्धाही पार पडल्या तसेच राष्ट्रीय व राज्य पातळीवर क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विदयार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विविध क्रीडास्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रमुख अतिथी संतोष धोत्रे यांनी मुलांना प्रेरणा देणारे भाषण केले. तसेच विदयार्थ्यांची शिस्तप्रियता कलागुण यांचे विशेष कौतुक केले. प्राचार्य एस. एन. साहू यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ. सपना डफळे व सौ. साजिदा इनामदार यांनी केले. उपप्राचार्या सौ. स्वाती कणसे यांनी शालेय प्रशासन, व्यवस्थापन समिती तसेच विदयालयातर्फे उपस्थितांचे आभार मानले.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य एस. एन. साहू, उपप्राचार्या सौ. स्वाती कणसे यांनी मार्गदर्शन केले. तसेच वरीष्ठ प्रशासकीय व्यवस्थापक मनोज जाधव, प्रशासकीय अधिकारी विभाकर वाळींबे यांनी मोलाचे सहकार्य केले. क्रीडा विभागाच्या प्रमुख सौ. सुमेधा साबळे, क्रीडाशिक्षक सौ. प्रज्ञा शिंदे, अनुप हिंगमिरे तसेच सुजय सावंत तसेच सहाय्यक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या सोहळ्यासाठी विशेष योगदान दिले.