Breaking News

कार्यालयालयास टाळे ठोकु ः सुरवसेशेवगाव/प्रतिनिधी

अनेक दिवसांपासून शेवगाव शहरांमधून जाणार्‍या राजमार्गावर मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. शहरांमधून जात असणारे अहमदनगर पाथर्डी-नेवासा, गेवराई-पैठण या राजमार्गावर मोठ-मोठे खड्डे पडल्यामुळे मोठे अपघात होत आहेत. तसेच ऊसाने भरलेले ट्रेलर ही या ठिकाणी पलटी होत आहेत.

 परंतु या खड्यांकडे सार्वजनिक बांधकाम जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप भाजपाचे शहराध्यक्ष रवी सुरवसे यांनी केला आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला कोणीही जबाबदार अधिकारी नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. तात्काळ या राज्य महामार्गावरील पडलेले खड्डे ताबडतोब बुजविण्यात यावेत. अन्यथा शेवगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला कोणत्याही क्षणी टाळे ठोकण्याचा इशारा भाजपचे शहर अध्यक्ष रवी सुरवसे यांनी दिलेल्या निवेदनात आज दिला आहे. याची होणारी पुढील जबाबदारीही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांची असेल.