एशियाटिक टेक्स्टाइल पार्क प्रकल्प होणार बंद; केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाचा निर्णय



सोलापूर : कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथे नियोजित असलेल्या एशियाटिक टेक्स्टाइल पार्कचा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने घेतला. 376 कोटींचा हा प्रकल्प आता गुंडाळण्याची शक्यता आहे. त्याच्या उभारणीसाठी पहिल्या टप्प्यात दिलेले 12 कोटी 90 लाख अनुदान वसूल करणार असल्याचे केंद्रीय वस्त्रोद्योग खात्याचे सचिव जी. के. रजनीश यांनी स्पष्ट केले. 

काँग्रेसच्या काळात 2006 मध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाली. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या शिफारशीने तत्कालीन केंद्रीय वाणिज्यमंत्री आनंद शर्मा यांनी सोलापूरसाठी हा प्रकल्प मंजूर केला होता. परंतु दुर्दैव असे की, त्याला पुढे नेता आले नाही. मंजुरीपासूनच हा प्रकल्प संचालकांच्या वादात सापडला. तो मुंबई उच्च न्यायालयापर्यंत गेला. त्यावर अद्यापही सुनावणी सुरूच आहे. परिणामी प्रकल्प उभारणीचे काम थांबले. केंद्राला तीन वर्षात हा प्रकल्प कार्यान्वित करणे अभिप्रेत होते. त्यासाठी वेळोवेळी संधीही देण्यात आली. परंतु संचालकांतील वाद संपला नाही. दिल्लीत नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत या प्रकल्पाचे काम वेळेत झाले नसल्याचा ठपका ठेवण्यात आला. प्रकल्पच रद्द करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget