Breaking News

वढेरा यांचा लंडनमध्ये आभासी फ्लॅट; ‘ईडी’च्या दाव्यामुळे काँग्रेस अडचणीतनवीदिल्लीः काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वधेरा अडचणीत येण्याची शक्यता आहे. वधेरा यांच्या ‘मनी लॉड्रिंग’ प्रकरणाच्या चौकशीने गंभीर वळण घेतले आहे. वधेरा हे लंडनमधील फ्लॅटचे व्हर्चुअल मालक असून ‘मनी लॉड्रिंग’च्या पैशातून ही संपत्ती घेतली असल्याचे अंमलबजावणी संचालनालया (ईडी)ने न्यायालयात सांगितले आहे. या फ्लॅटची किंमत 16 कोटी 80 लाख रुपयांहून अधिक आहे. 

‘ईडी’ने वधेरा यांचे जवळचे संबंध असलेल्या मनोज अरोराविरोधात अजामीनपात्र वॉरंटसाठी न्यायालयात अर्ज केला. ‘ईडी’ने मारलेल्या छाप्यानंतर अरोरा फरार आहे. लंडनमधील संपत्ती ही ‘मनी लॉड्रिंग’च्या पैशातून घेण्यात आली आहे. अरोरा या व्यवहारातील प्रत्यक्ष साक्षीदार असल्याचा दावा ‘ईडी’ने न्यायालयात केला आहे.  फरार असलेल्या संजय भंडारीने 16 कोटी 80 लाख किंमतीला हा फ्लॅट खरेदी केला होता. वधेरा यांच्या नियंत्रणात असलेल्या एका फर्मने याच किंमतीला या फ्लॅटची खरेदी केली होती. भंडारीविरोधात सीक्रेट अ‍ॅक्ट अंतर्गत 2016मध्ये खटला दाखल करण्यात आला आहे. 
भंडारीने नेपाळमार्गे देश सोडला असल्याची चर्चा आहे. 
‘ईडी’ने अरोराच्या दिल्ली आणि बेंगळुरूतील संपत्तीवर टाकलेल्या छाप्यानंतर तो फरार आहे. अरोराला अनेकदा समन्स बजावले असले, तरी तो हजर राहिला नाही. त्याची चौकशी करणे आवश्यक असून त्याला वधेरा यांच्या अनेक व्यवहारांची माहिती असल्याचे ‘ईडी’ने न्यायालयात सांगितले. 
व्हर्चुअल मालक हा एखाद्या संपत्तीचा अप्रत्यक्ष मालक असतो. कागदोपत्री हा मालक जरी नसला, तरी त्याचा हक्क असल्याचे भासवतो.