Breaking News

युवा वैज्ञानिक पुरस्कार वितरण


पाथर्डी/प्रतिनिधी स्वामी विवेकानंद यांच्या 156 व्या जयंतीनिमित्त विलेपार्ले मुंबई येथील हुंडा विरोधी चळवळ या सामाजिक संस्थेतर्फे चळवळीचे प्रणेते स्वातंत्र्य सैनिक आणि सानेगुरुजींचे मानसपुत्र दा.ब. तथा मामासाहेब कुलकर्णी यांच्या स्मृती प्रित्यर्थ 12 जानेवारी रोजी दरवर्षीप्रमाणे साने गुरुजी युवा आणि युवा वैज्ञानिक पुरस्कार देण्यात आले.  


त्यामध्ये पाथर्डी येथील अमोल शिवाजी राठोड यांस अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ग्रामीण भागातील अनाथ, निराधार , आदिवासी, बंजारा व कातकरी समुदायातील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या रचनात्मक योगदानाबद्दल साने गुरुजी राज्य युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सेवक फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अमोल राठोड यांनी राज्यभर 400 पेक्षा अधिक युवकांचे सशक्त सामाजिक संघटन उभारले असून त्या माध्यमातून सातत्याने समाजपयोगी कृतिशील उपक्रम राबविले जातात. निराधार घटकांसाठी आणि युवा विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल या पुरस्कारासाठी राज्यातून यावर्षी राठोड यांची निवड करण्यात आल्याचे हुंडा विरोधी    चळवळ संस्थेच्या महासचिव आशा कुलकर्णी यांनी सांगितले. कार्यक्रम विलेपार्ले येथे संपन्न झाला.