'जय महाराष्ट्र' आणि 'दिलखुलास' कार्यक्रमात उद्या सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांची मुलाखत

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र'आणि 'दिलखुलास' कार्यक्रमात ‘सर्वांगीण विकासाचा ध्यास’ या विषयावर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि. 1 जानेवारी 2019 रोजी संध्याकाळी 7.30 ते 8 या वेळेत प्रसारित होणार आहे. तर राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून मंगळवार दि. 1आणि बुधवार दि. 2 जानेवारी 2019 रोजी सकाळी 7.25ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका उत्तरा मोने यांनी ही मुलाखत घेतली आहे.

सामाजिक न्याय विभागाचे कामकाज, दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय, अनुसूचित जाती, जमाती,मागास प्रवर्गातील व्यक्तींना शासनामार्फत विविध योजनांचा लाभ होण्यासाठी देण्यात आलेले स्मार्ट कार्ड, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांच्या दर्जात सुधारणा करणे, रक्तातील नात्यांना जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय, देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया यांसह सामाजिक न्याय विभागामार्फत घेण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची सविस्तर माहिती श्री. वाघमारे यांनी 'जय महाराष्ट्र' आणि 'दिलखुलास' या कार्यक्रमातून दिली आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget