Breaking News

वंचितांना धान्य वाटप करा अन्यथा न्यायालयात दाद मागू : सानंदा खामगांव,(प्रतिनिधी): खामगांव मतदार संघात अन्न सुरक्षा योजनेचे उघडपणे उल्लंघन होत असून गोरगरीबांना त्यांच्या हक्काच्या धान्यापासून वंचित ठेवल्या जात आहे. अन्नसुरक्षा योजने अंतर्गत खामगांव मतदार संघातील इष्टांक वाढवून 67 हजार वंचित लाभार्थ्यांना त्वरीत स्वस्त धान्य वाटप सुरु करण्यात यावे यासह रेशनकार्ड धारकांच्या विविध मागण्या त्वरीत मंजूर करण्यात याव्यात अन्यथा जनतेला त्यांच्या हक्काचे अन्नधान्य मिळवून देण्यासाठी जनहितार्थ न्यायालयात दाद मागावी लागेल असा इशारा माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी दिला.

सानंदा यांच्या नेतृत्वात 9 जानेवारी रोजी खामगांव मतदार संघातील स्वस्त धान्यापासून पासून वंचित नागरिकांचा धडक मोर्चा उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर काढण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांचेसह वरिष्ठांना तहसीलदारामार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी बाजार समितीचे सभापती संतोष टाले, तालुका अध्यक्ष डॉ.सदानंद धनोकार, शेगांव तालुका अध्यक्ष विजय काटोले, महिला अध्यक्षा भारती पाटील, महिला शहर अध्यक्षा सुरजीतकौर सलुजा, न. प. काँग्रेस पक्षनेता अर्चना टाले, माजी नगराध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने, नगरसेवक भुषण शिंदे, माजी नगराध्यक्ष राणा अशोकसिंह सानंदा, न. प. चे माजी उपाध्यक्ष संतोष देशमुख, माजी जि.प.सदस्य सुरेश वनारे, सुरेशसिंह तोमर, श्रीकृष्ण धोटे, गजानन वाकुडकर, पं. स. सदस्य मनीष देशमुख, अमरावती विभागाचे समन्वयक धनंजय देशमुख, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष मो. वसीमोद्दीन,तालुकाध्यक्ष शफाभाई यांची उपस्थिती होती. माजी आमदार सानंदा म्हणाले की, देशातील कोणताही व्यक्ती अन्नधान्यापासून वंचित राहू नये यासाठी युपीए सरकारच्या काळात तत्कालीन प्रधानमंत्री डॉ.मनमोहनसिंग यांनी अन्न सुरक्षा योजना कायदा केला. त्या माध्यमातून देशातील गोरगरीब नागरिकांना स्वस्त दरात अन्नधान्य उपलब्ध झाले. परंतु सन 2014 नंतर केंद्रात व राज्यात सत्ताबद्दल झाल्यानंतर भाजपा सरकारच्या काळात धान्य वाटपाची सार्वजनिक वितरण व्यवस्था मोडकळीस येऊन गोरगरीबांना त्यांच्या हक्काचे धान्य वाटप बंद झाले.

असे सांगून खामगांव मतदार संघाचा धान्याचा इष्टांक कमी असल्यामुळे रेशनकार्ड धारकांना पाहिजे त्या प्रमाणात धान्य उपलब्ध होत नाही. तसेच खामगांव विधानसभा मतदार संघात खामगांव तालुक्यात 8474 रेशन कार्ड धारक आहेत व खामगांव शहरात जवळपास 5700 रेशनकार्ड धारक आहे. तर शेगांव तालुक्यातील खामगांव मतदार संघात येत असलेल्या 39 गावातील जवळपास 2100 रेशनकार्ड धारक आहेत. म्हणजेच संपूर्ण खामगांव मतदार संघात जवळपास 16100 रेशन कार्डातील 76000 गोरगरीब लाभार्थी आहेत व त्यांना आपल्या हक्काच्या अन्न धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. लोकप्रतिनिधीने दुसर्‍याच्या खांद्यावर बंदूक ठेवून खोटी वक्तव्ये करुन गोरगरीब जनतेची दिशाभूल करु नये असे सानंदा यांनी सांगितले. गोरगरीब जनतेने संघटीत होउन तोंडचा घास हिसकावणार्‍यांना त्यांची जागा दाखवावी असे सानंदांनी सांगितले. यावेळी तहसिलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले.

 गांधी चौक येथील जनसंपर्क कार्यालयापासून हजारो रेशनकार्ड धारकांचा शहरातील प्रमुख मार्गाने मोर्चा काढण्यात आला. मोर्चा दरम्यान काळ्या फिती लावून जोरदार घोषणाबाजी करीत भाजपा शासनाचा निषेध करण्यात आला. मोर्चा यशस्वी करण्याकरीता अजय तायडे, बिलालखा पठाण, तुषार चंदेल, एजाज देशमुख, मयुर हुरसाड, शहजादउल्लाखां, शेख उस्मान, हाफीज साहेब, माजी नगरसेवक मोहंमद नईम, परवेजखान पठाण, लाला जमादार, काकू पठाण, कृष्णा नाटेकर, जसवंतसिंग फीख, मंगेश इंगळे, अंकीत दोडे, नितीन गावंडे, बाजार समितीचे संचालक श्रीकृष्ण टिकार, विलाससिंग इंगळे, प्रमोद चिंचोळकार, रहीमखां दुल्हेखां, राजेश जोशी, प्रल्हादराव सातव, गोपाल सातव, भिकाजी इंगोले, डॉ.संजय घ्यार, सुभाष पेसोडे, लक्ष्मण दारमोडे, संताराम तायडे, मोतीराम खवले, सतीष तिवारी, सुरेश बोरकर, अमर पिंपळेकर, बाळु इंगळे, रवि भोवरे, विजु सुलताने, शांताराम करांगळे, पुंडलीक ढेंगे, संतोष चव्हाण, ज्ञानेश्‍वर शेजोळे, बशीर कुरेशी, यासीन भाई, त्रंबक देशमुख, फुलसिंग चव्हाण, शे. रशीद, जैनुशाह सुपडूशाह, बाला देशमुख, गजानन सोनोने, अवधुत टिकार, अजीजभाई चायवाले यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.