Breaking News

विजय तेंडुलकर यांचे भारतीय चित्रपटांसाठी मोठे योगदान : गोविंद निहलानी


पुणे : माझ्या चित्रपटांकडे पाहण्याचा दृष्टीकोन तयार होण्यात ज्येष्ठ नाटककार व लेखक विजय तेंडुलकर यांचा मोठा वाटा आहे. लेखक म्हणून त्यांच्या कामात सखोलता होती. भारतीय चित्रपटांसाठी त्यांचे योगदान मोठे आहे. परंतु माझ्या मते त्यांना त्यासाठी अपेक्षित ओळख मिळाली नसल्याची खंत ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी व्यक्त केली.

निहलानी यांच्या हस्ते पिफ फोरमचं आज उद्घाटन करण्यात आलं. फोरमच्या उद्घाटनानंतर ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी व ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांची महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी मुलाखत घेतली.त्यावेळी विचारलेल्या एका प्रश्‍नाच्या उत्तरात निहलानी बोलत होते. महोत्सवाचे सचिव रवी गुप्ता या वेळी उपस्थित होते.‘एनएसडी’त असताना मी शिडीवर चढून लाईटस् बदलणे, सुतारकामाच्या विभागात काम करणे, हे सर्व केले आहे. या संस्थेने मला नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाणी या सगळीकडे काम करताना गरजेची असलेली दृष्टी दिल्याचं ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी यावेळी सांगितलं. मुलाखतीव्दारे दोन्ही कलाकारांनी आपला कलाप्रवास मोकळेपणानं श्रोत्यांसमोर उलगडून दाखविला.