Breaking News

गाडगे महाराज महाविद्यालाच्या शिरपेचात मानाचा तुरा; राज्यातील ग्रामीण भागातील पहिले स्वायत्त महाविद्यालय होण्याचा मिळाला बहूमान


कराड (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेच्या येथील सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालास विद्यापीठ अनुदान आयोगाने स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा प्रदान केला आहे. ग्रामीण भागातील स्वायत्तता मिळविणारे गाडगे महाराज कॉलेज हे महाराष्ट्रातील पहिले महाविद्यालय ठरले आहे. सन 1954 मध्ये 54 विद्याथ्यार्ंंना उच्च शिक्षण देण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गाडगे महराज यांच्या नावाने दानशूर बंडो गोपाळा मुकादम यांच्या सहकार्याने हे महाविद्यालय उभे केले. 

रयत शिक्षण संस्था आपला शतक महोत्सव साजरा करत असताना, संस्थेच्या पहिल्या ग्रामीण भागातील महाविद्यालयास स्वायत्तता प्राप्त होणे ही महत्वाची बाबत आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक प्रबोधनाला दिशा देणारे विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी, शास्त्रज्ञ व उद्योजक देणाच्या सदगुुरु गाडगे महाराज कॉलेजने आपल्याला लौकिकात यानिमित्ताने मानाचा तुरा खोवला. शिवाजी विद्यापीठ कक्षेतील गुणात्मक व संख्यात्मक अग्रेसर असणार्‍या या महाविद्यालयाची विद्यार्थी संख्या 12,486 असून, सिनिअर महाविद्यालयात कायम व तासिका तत्त्वावर असे एकूण 152 प्राध्यापक असून ज्युनिअर विभागाकडे 98 प्राध्यापक, व्यवसाय शिक्षण 14, बीसीएस, बीसीए, बायोटेक विभागाकडे 30 उच्च शिक्षा विद्याविभूषित प्राध्यापक अध्यापनाचे काम करीत आहेत. तर 132 शिक्षकेत्तर सेवकही कार्यरत आहेत. विद्यार्थिनी वसतिगृहात 519 मुली व मुलांच्या वसतिगृहात 189 विद्यार्थी असून केशवराव पवार ग्रंथालयात 1,44,004 एवढी ग्रंथसंपदा आहे. महाविद्यालय 15 एकर परिसरात विभागलेले आहे. स्वायत्त दर्जा मिळाल्याने महाविद्यालयाला बर्तमान परिस्थितीला अनुरुप असा अभ्यासक्रम ठरविण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. त्यामुळे पारंपरिक अभ्यासाची चौकट बदलणे महाविद्यालयाला शक्य होणार आहे. 65 वर्षात विविध क्षेत्रात नाव कमावणारे गुणवंत विद्यार्थी या महाविद्यालयाने घडविले आहेत. स्वायत्त दर्जामुळे जागतिकीकरणाच्या युगात विद्यार्थी आत्मनिर्भर होतील. तसेच प्रात्यक्षिक ज्ञानामुळे विद्यार्थ्यांच्यात नवचेतना निर्माण होईल. जागतिकी करणात स्वायत्ततेच्या माध्यमातून विद्याध्यभिमूख शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना रोजगाराच्या व व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजमाने यांनी दिली.