Breaking News

माळेवाडी मध्ये पाणी फिल्टर उद्घाटन सोहळा संपन्न संजयभाऊ नरवडे यांचे अथक प्रयत्न


किट्टी आडगाव (प्रतिनिधी) विविध आजारांचे मूळ कारणच दूषित पाणी आहे.शुद्ध पाणी पिण्यास मिळाले तर ९० टक्के साथीच्या आजारांचे प्रमाण कमी होते. म्हणून पंचायत समिती सभापती जयदत्त आण्णा नरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली व सुलतानपूर (माळेवाडी) या गावाचे विद्यमान सरपंच संजयभाऊ नरवडे यांच्या अथक प्रयत्नातून गावातील नागरिकांना पिण्याच पाणी ठे वॉटर एटीम मशिन बसवण्यात आले.गावातील वॉटर फिल्टर एटीएमचे लोकार्पण पंचायत समिती सभापती जयदत्त आण्णा नरवडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना सभापती म्हणाले, ‘गावागावांत वॉटर एटीएम फिल्टर मशिन लावणे आवश्यक आहे. २० रुपये लिटरप्रमाण मिळणार्‍या मिनरल वॉटरसारखे शुद्ध पाणी या जलशुद्धिकरण केंद्रांतून लोकांना ५ रुपयांमध्ये १८ लिटर पाणी प्रत्येकाला मिळेल. स्वयंपाक आणि पण्याच्या पाण्यासाठी नागरिकांनी या पाण्याचा उपयोग करावा. त्यामुळे आरोग्याच्या सर्व तक्रारी संपतील.ग्रामीण भागाचे आरोग्य सुदृढ करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
यावेळी गावातील सरपंच संजयनरवडे, उपसरपंच उध्दव ढगे, विष्णुपंत नरवडे, बळीराम ढगे, सदाशिव लोखांडे, बालासाहेब धिरडे, विजय धिरडे, सुभाष लोखंडे, अशोक ढगे,लक्ष्मण तौर, बळीरामनिंबाळकर, संजय लोखंडे, भारतूनाईकनवरे, बापुराव ढगे यांच्या सह ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती