Breaking News

हँडबॉल स्पर्धेत महाराष्ट्र उपांत्य फेरीत


सोलापूर : यजमान महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा व हिमाचल प्रदेशने महिलांच्या 47 व्या राष्ट्रीय अजिंक्यपद हँडबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत महाराष्ट्राचा सामना छत्तीसगडशी पडेल. केगाव येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राने केरळवर 18-11 असा पराभव केला. पूनम कडव (5 गोल), पूजा व धनश्री ढमाल (प्रत्येकी 4 गोल) हे त्यांचे विजयाचे शिल्पकार ठरले. केरळकडून अभिरमल विशाने 3 गोल करीत लढत दिली. अन्य निकाल: भारतीय रेल्वे :26 (पवित्रा, सुषमा 5, अनुमित व संतव्हा 4) वि.वि. गुजरात :14 (जिमल 4, पायल 3). दिल्ली : 34 (तनिषा 7, संजिता व सोना 6, बरखा 5 ) वि.वि. केरळ ई : 24(अंजली वेणू 12). पंजाब : 23(हरविंदर, मनिंदर व हरपित कौर 7) वि.वि. तेलंगणा : 10 (प्रिया दर्शनी 5). हरियाना : 34 (प्राची 12, सोनिका 7) वि.वि. तामिळनाडू : 10. छत्तीसगड :20 (चित्रा 9, प्रिया 5) वि.वि. राजस्थान : 11 (रेखा चौधरी 3). उत्तरप्रदेश :25 (पूजा पाल 6, स्वर्णिमा व सुप्रिया जस्वाल 5) वि.वि. पश्‍चिम बंगाल : 13 (भक्तीका व मोमिनी 5). हिमाचल प्रदेश : 18 (भवानी 8, शिवानी 3) वि. वि. ओरिसा :