Breaking News

उंद्री सर्कलमध्ये झाला 1 कोटी 15 लाख विकास कामांचा शुभारंभ


 चिखली,(प्रतिनिधी): विकासाची गंगा तळागाळापर्यंत पोहचून ग्रामीण भागाचा कायापालट व्हावा हेच आपले धोरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या घोषणेनुसार उंद्री जिल्हा परिषद सर्कलमध्ये भरभरून सुरू असलेली विकासकामे हाच खरा विकासाचा पॅटर्न असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती श्‍वेताताई महाले यांनी केले.

 उंद्री सर्कलमध्ये मंजूर झालेल्या 1 कोटी 15 लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन करतांना त्या बोलत होत्या. 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा प्रियाताई बोंद्रे होत्या. श्‍वेताताई महाले यांच्या नेतृत्वात उंद्री जिल्हा परिषद सर्कलमध्ये विकासकामांचा झंझावात सुरू आहे. या अंतर्गत उंन्द्री, वैरागड, किन्हीसवड, हरणी, डासाळा, टाकरखेड हेलगा या गावातील रस्ते, सभामंडप, वॉलकंपाउड अशा विविध विकास कामांचे तसेच उंन्द्री जिल्हा परिषद सर्कलमधिल करवंड पंचायत समितीमधिल करवंड, पळसखेड सपकाळ, धोडप, डोगरशेवली, आंधई, चांधई या गावातील विविध विकास कामांचे भूमिपूजन श्रीमती महाले यांनी केले. या प्रसंगी प्रियाताई बोंन्द्रे नगराध्यक्षा चिखली, सुरेशआप्पा खबुतरे प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा, डॉ.प्रतापसिंह राजपुत जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, सुनील पोफळे तालुका अध्यक्ष भाजपा, वजीराबी शेख अनिस उपनगराध्यक्ष चिखली, पंजाबराव धनवे पाटील तालुका अध्यक्ष युवामोर्चा, सिंधुताई नखोत माजी जि.प.सदस्या, डॉ.गणेशराव कोल्हे भाजपा जिल्हा सचिव, गजानन इंगळे, संजय महाले, शिवराज पाटील जिल्हा सचिव युवामोर्चा, सरपंच भास्करराव आडळकर, माजी सरपंच रेखाताई माडवे, सरपंच स्वातीताई इंगळे, अनिताताई चौथे, उषाताई इंगळे, शिवाजी सावळे, अमोल सावळे, नारायणराव कोल्हे, किसनराव शिराळे, राधाताई कापसे, बळीराम काळे, जय बोन्द्रे, माजी सरपंच उर्मिला वाडेकर, सरपंच नंदा  धुरंधर, वसंता राठोड, शिवनारायण नखोत, किसनराव शिराळे, महादेव ठाकरे, संजय रिंढे, संतोष काळे, राजकुमार राठी, बलदेवसिंग सपकाळ, पुरुषोत्तम गुंजकर, गजानन दुधाळे, एकनाथ इंगळे, प्रमोद बहुरुपी, शिवाजी सावळे, अमोल सावळे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. फक्त घोषणा आणि दावे करुन सर्वसामान्य माणसांचे जीवन मरणाचे प्रश्‍न सुटत नसतात. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी स्वतः च्या कर्तव्याची जाणीव ठेवणे आवश्यक असते.

जनतेच्या आशीर्वादाने मिळालेल्या पदाचा उपयोग जनतेच्या सुख-सुविधा आणि विकासासाठी करणे हीच लोकप्रतिनिधीची भूमिका असायला हवी आणि याच भूमिकेतून उंद्री जिल्हा परिषद सर्कलमध्ये आपण जास्तीत जास्त विकासाची कामे करीत आहेत असे प्रतिपादन श्‍वेताताई महाले यांनी यावेळी बोलतांना केले. केवळ उंद्रीच नव्हे तर चिखली मतदारसंघातील प्रत्येक गावातील समस्या सोडविण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध आहोत अशी ग्वाही श्रीमती महाले यांनी या प्रसंगी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आ.चैनसुख संचेती, आ.डॉ.संजय कुटे, आ.आकाश फुंडकर, जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे आदी वरिष्ठांकडून जनसेवेच्या या कार्यामध्ये आपल्याला सर्वतोपरी मार्गदर्शन, सहकार्य व प्रोत्साहन मिळत असल्याबद्दल श्‍वेताताई महाले यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमात बोलतांना सुरेशअप्पा खबुतरे यांनी रस्ता, पाणी आणि मुलभूत सुविधांच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी श्‍वेताताई महाले पाटील करीत असलेल्या प्रयत्नातून विकासाला चालना मिळाल्याचे मत व्यक्त केले. उंद्री प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला फेरमंजूरी मिळवून या परिसरातील पाणी समस्या श्‍वेताताई महाले यांनी सोडवल्याचे खबुतरे म्हणाले. 

 नगराध्यक्षा प्रियाताई बोंद्रे यांनी उंद्री जिल्हा परिषद सर्कलमध्ये विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबवून श्‍वेताताई महाले पाटील सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटक्ला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. डॉ प्रतापसिंह राजपूत यांनी कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी म्हणून श्‍वेताताई महाले यांचे कार्य उल्लेखनीय असून आपल्या मतदारांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्या सातत्याने कार्यरत असल्याचे प्रतिपादन त्यांच्या भाषणातून केले. श्‍वेताताई महाले यांनी सातत्याने पाठपुरावा करून उंद्री प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला 2 कोटी 85 लाख नव्याने मंजूरी मिळवली याचा उल्लेख देखील डॉ.राजपूत यांनी केला.