Breaking News

कोल्हापुरातील बँकेवर 1 कोटींचा दरोडा


कोल्हापूर/ प्रतिनिधीः
यशवंत सहकारी बँकेच्या शाखेवर रात्री चोरट्यांनी दरोडा टाकला. त्यात सुमारे एक कोटी रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. खिडकीचे ग्रील तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करून बँक लुटली. सकाळी नऊच्या सुमारास ही घटना उघड झाली. पन्हाळा तालुक्यातील कळे गावातल्या शाखेत हा दरोडा पडला.

कळे येथे भोगाव बाजार मार्गावर यशवंत सहकारी बँकेची शाखा मुख्य बाजारपेठेत आहे. गुरुवारी रात्री चोरट्यांनी बँकेच्या इमारतीच्या उजव्या बाजूच्या खिडकीचे ग्रील गॅस कटरच्या साहाय्याने तोडून बँकेत प्रवेश केला. त्यांनी प्रथम सीसीटीव्ही आणि संगणकीय यंत्रणेची वायर कापून ते बंद केले. त्यानंतर त्यांनी लॉकरच्या सभोवतीची जाळी कापून बँकेच्या ताब्यातील सोन्याच्या दागिन्यांची कलमे ताब्यात घेतली. तिजोरीचे लॉक कापून त्यातील 8 लाख 57 हजार रुपयांची रोकड लंपास केली.