मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्यांच्या कामासाठी 10 कोटींचा निधी - आ.कर्डिले


अहमदनगर/प्रतिनिधी : “नगर तालुक्यातील विविध गावांतील 6 रस्त्यांच्या कामासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत प्रशासकीय मान्यता दिली असून या रस्त्यांच्या कामासाठी 10 कोटी 30 लाख 23 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे’’, अशी माहिती आ.शिवाजी कर्डिले यांनी दिली.

यामध्ये राहुरी मतदार संघात समावेश असलेल्या नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी ते सटूबाई मंदिर रस्ता (2.5 किमी) 1 कोटी 89 लाख 14 हजार, जेऊर आठरे वस्ती ते ससेवाडी रस्ता (1.880 किमी) 1 कोटी 66 लाख 80 हजार, ससेवाडी ते महादेवखोरं रस्ता (1.940 किमी) 1 कोटी 52 लाख 61 हजार, कापूरवाडी ते दत्तवाडी रस्ता (0.925 किमी) 83 लाख 13 हजार, गव्हाणवस्ती (काळामळा वस्ती ते मांजरसुंबा ) रस्ता (1.540किमी) 1 कोटी 35 लाख 70 हजार तसेच आ.संग्राम जगताप यांच्या शिफारशीनुसार नगर शहर विधानसभा मतदार संघातील नालेगाव, वारुळाचा मारुती ते निंबळक रस्ता (3.475किमी) 3 कोटी 2 लाख 68 हजार असा निधी मंजूर झाला आहे.

या रस्त्यांच्या कामाबाबत नागरिकांनी आपणाकडेही मागणी केली होती. त्या अनुषंगाने आपण शासन स्तरावर पाठपुरावा करून सदरचा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत प्रस्तावित करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती. अखेर या पाठपुराव्यास यश आले असून नगर तालुक्यातील या विविध 6 रस्त्यांच्या कामासाठी 10 कोटी 30 लाख 23 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच याबाबत निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. या रस्त्याची देखभाल दुरुस्ती संबंधित विभागाकडून काम पूर्ण झाल्यानंतर 5 वर्ष करण्यात येणार आहे. त्यासाठी 47 लाख 61 हजाराचा अतिरिक्त निधीही मंजूर झाला आहे. या निधीच्या मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे सहकार्य लाभले असल्याचेही आ.कर्डिले यांनी सांगितले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget