11 कोटी रुपयांच्या विकासकांमाचा राम शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा


जामखेड ता/प्रतिनीधी: जामखेड तालुक्यातील शिऊर येथे 11 कोटी रुपयांचे विविध विकास कामे व झालेल्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला आहे.

  पालकमंत्री प्रा.राम शिंदे बोलताना म्हणाले की, सरकार हे दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी खंबीर पणे पाठीशी उभे आहे. तसेच जिल्ह्यातील ज्या ठिकाणी चारा छावण्याची आवश्यकता असेल त्या ठिकाणी तातडीने चारा छावणी सुरू केली जाईल असे पालकमंत्री राम शिंदे हे शिऊर येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व झालेल्या कामाचा लोकार्पण सोहळ्या प्रंसगी  बोलत होते. जामखेड आणि कर्जत भागाच्या सर्वागीण विकासासाठी प्रयत्नशील राहील. तुमच्या आशिर्वादाने आणि एका मताने मला तुम्ही आमदार केले. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेट मंत्री केले. त्यामुळे आज सर्व मतदारसंघात कोट्यावधी रुपयांचा निधी येत आहे. आणि विकासाची गंगा वाहत आहे. हा विकास आसाच तुमच्या आशिर्वादाने पुढे सुरू राहणार आहे. 
  खा.दिलीप गांधी यांनी जाहीर सांगीतले की, अपंगांसाठी 5 टक्के आरक्षण नोकरीमध्ये देण्यात आले आहे. शेतकर्‍यांच्या हितासाठी भाजपचे सरकार सर्व सामन्य जनतेच्या खंबीर पणे पाठीशी उभे आहेत. यावेळी 5 कोटी 18 लाख रुपयांचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले आहे.

  यावेळी खा. दिलीप गांधी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर, भाजपचे तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, सभापती सुभाष आव्हाड, उपसभापती सूर्यकांत मोरे, माजी सभापती व वेधेमान सदस्य भगवानराव मुरूमकर, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचारणे, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजय काशीद, नगराध्यक्ष निखिल घायतडक, संचालक महादेव डुचे, सागर सदाफुले, सुभाष जायभाय, शिलाभाई शेख, शिऊरचे सरपंच हनुमंत उतेकर, बांधखडक चे सरपंच मा केशव वनवे,सावरगांव चे सरपंच काकासाहेब चव्हाण,राजुरी चे सरपंच गणेश कोल्हे, धामणगाव चे सरपंच माहारुद्र महारनवर, खांडवी चे सरपंच डॉ गणेश जगताप, अ‍ॅड विश्‍वास निकम, उपसरपंच सिध्देश्‍वर तनपुरे, चोंडीचे उपसरपंच पांडुरंग उबाळे, चेअरमन माऊली कडू, सचिव भाऊसाहेब तनपुरे, ग्रा.प.सदस्य गणेश माने उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget