Breaking News

चर्मकार समाजाचा 17 ला वधू-वर मेळावा


अहमदनगर / प्रतिनिधी : महाराष्ट्र चर्मकार उठाव संघ व अहमदनगर जिल्हा चर्मकार समाज वधू-वर सूचक मंडळाच्या वतीने दि.17 फेब्रुवारीला चर्मकार समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय व पालक मेळावा नगरमधील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, स्वस्तिक चौक, टिळकरोड येथे सकाळी 10 ते संध्यकाळी 5 यावेळेत आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती मंडळाचे जिल्हाध्यक्ष माणिकराव नवसुपे यांनी दिली. मेळाव्याचे उदघाटन आ. संग्राम जगताप व महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते व महाराष्ट्र चर्मकार उठाव संघाचे अध्यक्ष नगरसेवक अशोक कानडे असणार आहेत.

तसेच यावेळी नवनिर्वाचित समाजाचे नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, सुनील त्र्यंबके तसेच प्रदेशाध्यक्ष मोतीलाल अहिरे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी समाजातील सर्व वधू -वरांनी उपस्थित राहावे व अधिक माहितीसाठी आपले बायोडाटा केंद्रप्रमुख रावसाहेब कानडे (मो.9890673045) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन संस्थापक अशोक कानडे, अध्यक्ष माणिकराव नवसुपे, कार्याध्यक्ष रामदास उदमले, खजिनदार अ‍ॅड. राजाराम केदार, सरचिटणीस शरद कांबळे, सिकंदर वाकरे, उपाध्यक्ष शिवाजी अभिनव, आजिनाथ खरात, सचिव विलास सोनवणे, सहसचिव ज्ञानेश्‍वर म्हेसमाळे, कार्यवाहक अरुण शिंदे, सहकार्यवाहक अरविंद कांबळे, सोशल मीडिया प्रमुख गौतम सातपुते, प्रसिद्धीप्रमुख संजय कानडे आदींनी केले आहे.