Breaking News

नेवाशाजवळ अपघातात तीन ठार; 17 जखमी


नगर / प्रतिनिधीः
नगर-औरंगाबाद रस्त्यावरील कांगोणी फाटा येथे बस व दुधाच्या टँकरच्या अपघातात तीन जण ठार तर 17 जण जखमी झाल्याची घटना शनिवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.

रॉयल चिंतामणी ट्रॅव्हल्सची बस (क्रमांक एम.एच.23 -4086) ही औरंगाबादहून नगरकडे असताना कांगोणी फाटा येथे दूध संकलन करत उभ्या असलेल्या दुधाच्या टँकरला( क्रमांक एम.एच.12-एच.डी.5402) पाठीमागून धडकली. या अपघातात संजय रामकृष्ण सावळे (वय-40) आकाश सुरेश यागड (वय-27, रा. खंडाळा,जि. बुलडाणा) व कल्पेश गुलाबराव व्यवहारे (वय- 22, रा.सरोखपीर, ता.औटला,जि. बुलडाणा) हे जागीच ठार झाले. जखमींमध्ये मराठवाडा, विदर्भा व पुण्यातील लोकांचा समावेश आहे. त्यांना नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले आहे.