Breaking News

लोणीच्या मिनी मॅरेथॉनमध्ये धावले 23 हजार स्पर्धकलोणी प्रवरा/प्रतिनिधी
लोणीच्या पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील मिनी मॅरेथॉनमध्ये समृद्ध शरीर आनंदी जीवनाचा संदेश देत थंडी असताना देखील 23 हजार अबालवृद्ध यांनी स्पर्धेत सहभागी घेतला. प्रवरा मेडिकल ट्रस्ट आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने रविवारी 17 वी पद्मभूषण डॉ. बाळासाहेब पाटील मिनी मॅरेथॉन ही समृद्ध शरीर आनंदी जीवन हा संदेश घेऊन संपन्न झालेल्या रन फॉर हेल्थ स्पर्धेत 23 हजार स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.
या स्पर्धेचा प्रारंभ सकाळी 6:30 वाजता प्रवरा अभिमत विद्यापीठाचे प्र.कुलपती डॉ.राजेंद्र विखे पाटील यांच्या शुभहस्ते झाला. स्पर्धेला प्रारंभ होताच हजारो अबालवृद्ध थंडीची तमा न बाळगता धावते झाले. सिने अभिनेत्री आणि क्रीडापटू शितल पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी प्र. कुलपती डॉ. राजेंद्र विखे, कुलगुरू डॉ. जयराज, पंजाबराव आहेर, डॉ. नितीन कुंकुलोळ, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सचिव भारत घोगरे, डि.यु खर्डे आदींसह स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
21 गटात झालेल्या स्पर्धेमध्ये 1 किलोमीटर अंतर वयोगट मुले 10 वर्षांखालील गटांमध्ये प्रथम बक्षीस संस्कार चौगुले, द्वितीय बक्षीस मनोज बोंबले, तृतीय पक्षी आणि अनिकेत सुराळे यांनी मिळवले. तर मुली 10 वर्षांखालील मुलींच्या गटामध्ये श्रद्धा सोनवणे प्रथम वैष्णवी राऊत द्वितीय तर तृतीय बक्षीस समीरा शेख आणि श्रेया गायकर यांनी मिळवले. महिलांच्या 40 पुढील वयोगटांमध्ये सविता गुंजाळ प्रथम सुनीता घोलप द्वितीय तर रोहिणी अकोलकर तृ क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. याच गटातील अपंगांमध्ये अनिकेत पवार प्रथम रवींद्र त्रिभुवन द्वितीय विराज बागुल तृतीय क्रमांक तृतीय क्रमांक मिळवला. अपंग मुलींमध्ये विशाखा देसले यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
3 किलोमीटरच्या स्पर्धेत 40 वर्षांखालील पुरुषांमध्ये प्रथम क्रमांक डॉ. प्रमोद विखे व्दितीय प्रशांत अकोलकर तृतीय क्रमांक डॉ ज्ञानदेव गादेकर यांनी मिळवला. याच गटात 10 ते 16 वयोगटात मुलांमध्ये अजय साबळे प्रथम संकेत बनकर द्वितीय काळू उईके यांनी तृतीय क्रमांक मिळविला. 10 ते 16 वयोगटात मुलींमध्ये मानसी झुराळे प्रथम नम्रता झुराळे द्वितीय तर तृतीय क्रमांक करीना बेग यांनी मिळविला. महिलांच्या खुल्या गटांमध्ये उज्ज्वला सानप प्रथम दिव्या संजय द्वितीय हसीना शेख यांनीतृतीय क्रमांक मिळविला. या गटात 16 ते 40 वयोगटात पुरुषांमध्ये प्रवीण राऊत प्रथम मोहम्मद शेख व्दितीय सुदर्शन मते तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले.
5 किलोमीटरच्या स्पर्धेमध्ये सोळा ते दहा ते सोळा वयोगटात मुलांमध्ये नवनाथ बाचकर प्रथम, द्वितीय सुराळे प्रतिक तर रोहित जाधव तृतीय क्रमांक मिळविला. मुलींमध्ये 10 ते 16 वयोगटात प्रथम क्रमांक विशाखा बास्कर द्वितीय आरती राठोड तृतीय क्रमांक हर्षाली महाले यांनी मिळविला. पुरुषांच्या पुरुष 16 ते 40 वयोगटात मोहन गिर्‍हे प्रथम सुनील कातोरे व्दितीय तर फय्याज तांबोळी तृतीय क्रमांक मिळविला. 40 वर्षांपुढील गटात डॉ. मधुकर जत्ती, प्रथम इंद्रभान कुसळकर, द्वितीय तर पाराजी गागरे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. महिलांच्या खुले गटात अंकिता शेवाळे प्रथम कोमल पवार द्वितीय साक्षी जंजाळ तृतीय क्रमांक मिळविला.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था आणि प्रवरा अभिमत विद्यापीठातील क्रीडा शिक्षक डॉ.सुनील बुलार, बाळासाहेब विखे, अप्पा कडसकर, अफजल पटेल आदिंनी विशेष परिश्रम घेतले.