Breaking News

श्रीगोंदे येथे पुणे विभागीय स्केटिंग स्पर्धा श्रीगोंदे/प्रतिनिधी दि.24 फेब्रुवारी रोजी श्रीगोंदे येथील महाराजा जीवाजीराव शिंदे महाविद्यालयात पुणे विभागीय स्केटिंग स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये पुणे विभागातील सुमारे 200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धा टेनासीटी, स्कॉड आणि इनलाईन या तीन प्रकारांत पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ज्ञानदेव म्हस्के यांच्या हस्ते झाले. स्केटिंग सारखा आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळला जाणारा खेळ श्रीगोंद्या सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी देखील चांगल्या प्रकारे आत्मसात केला आहे, तसेच आनंदकर 9 वर्षांपासून श्रीगोंदे शहरात याचे प्रशिक्षण देत आहेत. निश्‍चितच यापुढील काळात श्रीगोंद्यातून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होतील. अशी खात्री वाटते. असे मनोगत म्हस्के यांनी अध्यक्ष स्थानावरून बोलताना व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य खोमणे, ग्रँडमास्टर संजय आनंदकर, टीम टॉपर्सचे प्रशांत पाटोळे, मा.उपनगराध्यक्षा अर्चना गोरे, अनिल दुबळे, अविनाश घोडके, महेश कोळी, डॉ.कसरे, डॉ.कदम, उद्योजक मोहन भिंताडे, सुवेंद्र गांधी, प्रकाश निंभोरे, अजीम जकाते, विवेक राऊत, संतोष भंडारी, अ‍ॅड.स्वानंद राऊत, निलेश मेहेर, दिगंबर भुजबळ, सुधीर राऊत, राजेंद्र चौधरी, रामेश्‍वर शिंदे आदी उपस्थित होते.


श्रीगोंदे/प्रतिनिधी : दि.24 फेब्रुवारी रोजी श्रीगोंदे येथील महाराजा जीवाजीराव शिंदे महाविद्यालयात पुणे विभागीय स्केटिंग स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये पुणे विभागातील सुमारे 200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धा टेनासीटी, स्कॉड आणि इनलाईन या तीन प्रकारांत पार पडल्या.

 स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ज्ञानदेव म्हस्के यांच्या हस्ते झाले.स्केटिंग सारखा आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळला जाणारा खेळ श्रीगोंद्या सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी देखील चांगल्या प्रकारे आत्मसात केला आहे, तसेच आनंदकर 9 वर्षांपासून श्रीगोंदे शहरात याचे प्रशिक्षण देत आहेत. निश्‍चितच यापुढील काळात श्रीगोंद्यातून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होतील. अशी खात्री वाटते. असे मनोगत म्हस्के यांनी अध्यक्ष स्थानावरून बोलताना व्यक्त केले.

 यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य खोमणे, ग्रँडमास्टर संजय आनंदकर, टीम टॉपर्सचे प्रशांत पाटोळे, मा.उपनगराध्यक्षा अर्चना गोरे, अनिल दुबळे, अविनाश घोडके, महेश कोळी, डॉ.कसरे, डॉ.कदम, उद्योजक मोहन भिंताडे, सुवेंद्र गांधी, प्रकाश निंभोरे, अजीम जकाते, विवेक राऊत, संतोष भंडारी, अ‍ॅड.स्वानंद राऊत, निलेश मेहेर, दिगंबर भुजबळ, सुधीर राऊत, राजेंद्र चौधरी, रामेश्‍वर शिंदे आदी उपस्थित होते.