Breaking News

पुलवामा हल्ल्यानंतर कारवाईचा मोदींचा 24 तासांतच निर्णय


नवी दिल्ली : पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे 14 फेब्रुवारीला ‘जैश- ए-मोहमंद’ या दहशतवादी संघटनेकडून आत्मघाती हल्ला घडवण्यात आला. या हल्ल्यात केंद्रीय राखीव दलाच्या 40 जवानांचे प्राण गेले. या भ्याड हल्ल्याचे उत्तर देण्याची मागणी संपूर्ण देशातून करण्यात आली. कारवाईचे दडपण असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा देशातील जनतेला कारवाईचे आश्‍वासन दिले होते. 

या हल्ल्याचे उत्तर म्हणून भारतीय वायुदलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये असणार्‍या दहशवादी तळांवर हल्ला केला. या संपुर्ण कारवाईचा निर्णय पंतप्रधानांनी पुलवामा हल्ल्यानंतर अवघ्या चोवीस तासांच घेतला होता, अशी माहिती समजली.