Breaking News

कराडला सरपंचपदासाठी 33, तर सदस्यपदासाठी 188 अर्ज


कराड (प्रतिनिधी) : तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज शनिवार (दि.9) रोजी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 121 अर्ज दाखल झाले आहेत.

त्यामध्ये मसूर, वाण्याचीवाडी, यादववाडी, माळवाडी, वडोली भिकेश्‍वर, धनकवडी, कचरेवाडी, पवारवाडी व राजमाची या नऊ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाकरिता 33 तर 75 सदस्य पदासाठी 188 अर्ज दाखल करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार राजेश चव्हाण यांनी दिली.