Breaking News

डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांतून 4 कोटी 54 लाखांचा निधी


कराड (प्रतिनिधी) : कराड शहरातील विविध विकाकामांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून एकूण 4 कोटी 54 लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष नामदार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून कराड शहरासाठी या भरघोस निधीची तरतूद झाली असून, या निधीच्या माध्यमातून शहरात रस्त्यांची सुधारणा केली जाणार आहे. शिवाय आरोग्यसह घनकचर्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.

कराड शहरातील नव्याने विस्तारलेल्या भागात नागरी सुविधांसाठी विकासनिधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी नामदार डॉ. अतुल भोसले यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नगरविकास खात्याचे राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे केली होती. या मागणीनुसार नगरविकास विभागामार्फत डिसेंबर 2018 मध्ये विविध कामांसाठी 3 कोटी 10 लाख 6 हजार 572 रूपयांचा निधी प्राप्त झाला होता. नगरविकास खात्यामार्फत विशेष रस्ता अनुदान म्हणून कराड नगरपालिकेला 2 कोटी रूपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. तसेच 14 व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार मूलभूत अनुदानापोटी 2 कोटी 54 लाख 13 हजार 220 रूपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे.