Breaking News

जामखेडमध्ये वेगवेगळ्या साहित्यासह 4 लाखाची चोरीजामखेड/प्रतिनिधी फिर्यादीने संशयावरून इंडिका कारचा पहाटेच्या सुमारास पाठलाग करून कार पकडली असता गाडित काँम्पूटरसह 4 लाख 90 हजार रुपयाचे वेगवेगळे साहित्य आढळून आले. जामखेड पोलिसांनी सदर माल ताब्यात घेऊन दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये एका शिक्षकाच्या मुलाचा समावेश असल्याचे समजते. सध्या चोरांचा मोठा सुळसुळाट सूरू आहे. त्यामुळे मोठे रँकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. 

    याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी जावेद मैनुद्दीन शेख रा. नूरानी काँलनी जामखेड हे आपले नगररोडवरील गँरेज दूकान बंद करून घरी गेले होते. पहाटे 4 च्या सुमारास मित्रांनी फोन करून गँरेज उघडे असून समोर इंडिका कार उभा असल्याचे सांगितले. तेव्हा फिर्यादी आपल्या गॅरेजकडे आले असता दूकानाचे शटर उघडे पाहुन समोर उभा असलेल्या इंडिका कारमधील दोघांना हटकले असता त्यांनी काही न बोलता कार सह पळून जाऊ लागले. यावेळी फिर्यादीने त्यांचा पाठलाग मातकुळी (ता.आष्टी जि.बीड) येथील पाझर तलावापर्यत केला. सदर गाडी चोरांनी तेथेच सोडून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. यानंतर फिर्यादीने जामखेड पोलिसांना घटना सांगितली. तेव्हा पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले. व सदर गाडीची झडती घेतली. 

एक लाख रुपयांची सिल्व्हर रंगाची (एम एच 12 बी व्ही 7203) इंडिका कारसह 4 लाख 90 हजार रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला. यामध्ये टायर, काँम्पूटर, एलएडी स्क्रीन, स्कँनिंग, प्रिंटर, यूपीएस मशीन, की बोर्ड, माऊस, पाण्याची मोटार व  एक तसेच फिर्यादीच्या गँरेजमधून एक लाख 30 हजाराचे टायर 90 हजाराचे हूप्पर साऊंड अशा वस्तूंचा समावेश आहे. जावेद मैनुद्दीन शेख यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारूती राजेंद्र जरे व एक अनोळखी इसम दोघे रा. मातकुळी या दोघां विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक पांडूरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. बापूसाहेब गव्हाणे करत आहेत.