Breaking News

मुलभूत सुविधा कामाअंतर्गत 4 कोटी रुपयांच्या प्रस्तावांना श्‍वेता महाले यांच्या प्रयत्नातून मंजूरी


 चिखली,(प्रतिनिधी): ग्रामीण भागातील नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध  करून देण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून शासनाकडे प्रस्ताव सादर केले जातात.  या प्रस्तावांना मंजूरी देऊन राज्य सरकारतर्फे त्यासाठी निधी देण्यात  येतो. 25-15 या शिर्षकाखाली या निधीचे वितरण करण्यात येते. जिल्हा परिषद  महिला व बालकल्याण सभापती श्‍वेताताई महाले यांनी सादर केलेल्या  प्रस्तावांना मान्यता मिळाली असून राज्य सरकारने त्यासाठी तब्बल 4 कोटी  रुपयांचा निधी देऊ केला आहे.

या अंतर्गत चिखली विधानसभा मतदार संघातील  विविध गावांमध्ये 80 वेगवेगळी कामे सुरू होत असून याद्वारे ग्रामीण  भागातील नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत.  ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास सदैव बाळगणार्‍या कर्तव्यदक्ष  लोकप्रतिनिधी श्‍वेताताई महाले पाटील यांनी 25-15 अंतर्गत चिखली विधानसभा  मतदार संघातील अंतर्गत रस्ते व सभामंडपाचे 80 प्रस्ताव राज्य सरकारकडे  सादर केले होते. आपल्या प्रस्तावांबाबत त्यांनी संबंधित खात्याच्या  मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांना यश  मिळाले असून राज्य शासनाने चिखली मतदारसंघातील प्रस्तावित वेगवेगळ्या 80  कामांसाठी तब्बल 4 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केला आहे. या  प्रक्रियेत अर्थमंत्री सुधिरजी मुनगंटीवार, पंकजाताई मुंढे, जिल्ह्याचे  पालकमंत्री मदन येरावार, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, यांनी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला. परिणामी चिखली  मतदारसंघात श्‍वेताताई महाले यांनी सुरू केलेल्या विकासपर्वाला आणखी वेग  प्राप्त झाला आहे. 

 श्‍वेताताई महाले यांनी चिखली विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागाचा  कायापालट करण्याचा संकल्प केला आहे. त्याच्या पूर्ततेसाठी त्या सातत्याने  अथक प्रयत्न करीत आहेत. याचीच फलनिष्पत्ती म्हणून प्रत्येकी 5 लक्ष रुपये  किमतीच्या कामाच्या 80 प्रस्तावांना मान्यता मिळाली असून त्यासाठी तब्बल  4 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीमधून  चांधई, वाघापूर ते  रायपूर, काटोडा, पेनसावंगी, तोरणवाडा, सावरगाव डुकरे, शेलगाव जहाँगीर,  पळसखेड दौलत, करनखेड, मुंगसरी, भोरसा भोरसी, भानखेड, सवना, मुंगसरी, खोर,  नायगाव बु ॥, आमखेड, ब्रह्मपुरी, अमडापूर, गोदरी,मालगणी, करतवाडी, वळती,  बेराळा, दहीगाव, मागणी, साकेगाव, मातमखेड, पांगरी, भडगाव, सावळी, साखळी  बु ॥, ढालसावंगी, कुलूमखेड, दहीद खु ॥, चिखला, कुंभेफळ, ढासाळवाडी,  कारखेड, मौढाळा, घाटनांद्रा, जांब, म्हसला बु ॥, येवता, रायपूर, शिंदी,  तेल्हारा, किन्होळा, उत्रादा, शेलोडी, चंदनपूर, पांढरदेव, कवठळ व  गांगलगाव येथे अंतर्गत रस्ते चांधई, शिरपूर, कोलारा, आन्वी, जांभोरा,  वैरागड, पळसखेड सपकाळ, भालगाव, दिवठाणा,  एकलारा, चांडोळ, पळसखेड,  धामणगाव, हातणी, वरुड, जामठी, सिंदखेड, माळशेंबा, वरखेड, डोंगरगाव,  इसोली, बोरगाव काकडे, भोकर, करवंड, टाकरखेड हेलगा, येवता, व उंद्री येथे  सभामंडप तर शिंदी हराळी येथे नालीबांधकाम व खैरव येथे संरक्षक भिंतीचे  बांधकाम करण्यात येणार आहे.         

25 - 15 या निधीमधून अंतर्गत रस्त्याच्या कामांना मान्यता  मिळाल्याने ग्रामीण भागातील शेतकरी, लहान व्यापारी व गावकर्‍यांना जलद व  सुलभ दळणवळणाची सुविधा मिळणार असून सभामंडपामुळे स्थानिकांना विविध लहान  - मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करणे सुलभ होणार आहे. सदर कामांना  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूरी दिल्याबद्दल तसेच  सुधिरजी  मुनगंटीवार, पंकजाताई मुंढे, पालकमंत्री मदन येरावार, गृह राज्यमंत्री  डॉ.रणजित पाटील, आमदार चैनसुख संचेती, आ.डॉ. संजय कुटे, आ.आकाश फुंडकर व  भाजपा जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा  केल्याबद्दल श्‍वेताताई महाले यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले आहे.