Breaking News

भाजपा ओबीसी मोर्चाच्या तालुका सरचिटणीसपदी प्रा. बेल्हेकर


अहमदनगर/प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या नगर तालुका सरचिटणीसपदी प्रा. विजय बेल्हेकर यांची नियुक्ती झाली. तसे पत्र ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष दत्तात्रय हिरणवळे, तालुकाध्यक्ष श्यामराव घोलप, चिटणीस किरण शिंदे उपस्थित होते. याप्रसंगी विजय बेल्हेकर म्हणाले,“नगर तालुक्यातील सर्व गावांमध्ये ओबीसी मोर्चाच्या शाखा सुरु करण्यात येतील तसेच शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मोर्चाच्या माध्यमातून काम करु.’’ प्रा. बेल्हेकर यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या.