Breaking News

शिव संग्रामच्या संकल्प मेळाव्यात हजारोंच्या संख्येत सहभागी व्हा : संदिप गायकवाड


बुलडाणा,(प्रतिनिधी): बुलडाणा जिल्ह्याचे नाव राष्ट्रमाता जिजाऊ नगर करा, शेतकर्‍यांना व शेतमजुरांना मासिक 3 हजार रुपये पेन्शन लागु करा, मातृतिर्थ सिंदखेडराजायेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारुड पुतळा उभारण्यात यावा, बेरोजगार तरुण-तरुणींना बेरोजगार म्हणून 5 हजार रुपये मासिक भत्ता देण्यात यावा, शेतकर्‍यांची सरसगट कर्जमाफी करण्यात यावी, यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी शिवसंग्राम संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.विनायकराव मेटे यांच्या अध्यक्षतेखाली 15 फेब्रुवारी रोजी 3.30 वाजता भव्य संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

या मेळाव्यात हजारोंच्या संख्येने सहाागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष संदिप गायकवाड यांनी केले. या मेळाव्यात प्रमुख उपस्थिती शिवसंग्रामचे प्रदेश अध्यक्ष तानाजीराव शिंदे, महिला आ.भारतीताई लव्हेकर, अिानेत्री महिला प्रदेश अध्यक्षा दिपालीताई सैय्यद (भोसले), युवक प्रदेश अध्यक्ष उदयकुमार अहेर, विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष अविनाश खापे, अजय बिलारी यांचे मार्गदर्शन व प्रमुख उपस्थिती लााणार आहे. शिवसंग्राम संघटनेने आजपर्यंत संपुर्ण राज्यात वेगवेगळ्या विषयावर लढा उभा करुन अनेक मागण्यापूर्ण करुन घेतल्या आहे. यामध्ये प्रामुख्याने मुंबई येथील अरबी समुद्रातील छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक, राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्‍न, एम.पी.एस.सी.च्या विद्यार्थ्यांच्या परिक्षेची वयोमर्यादा वाढवुन घेतली. शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी लढा दिला. याच पार्श्‍वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यातही जिल्हाध्यक्ष संदिप गायकाड यांच्या नेतृत्वात जिल्हाभर संघटनेचे जाळे पसरले असून गाव तेथे शाखा हा संकल्प राबविणे सुरु आहे. या मेळाव्यात व्यसनमुक्तीवर कार्य करणार्‍या प्रेमलता सोनुने यांचा सत्कार होणार असून समाजात वेगवेगळ्या स्तरावर भरीव कार्य करणार्‍या प्रमुख सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार आयोजित केला आहे.