Breaking News

राजहंस दूध संघाकडून वर्पे कुटुंबाला आर्थिक मदत


/प्रतिनिधी
तालुक्यातील कनोली येथील वाबळे वस्तीवर शनिवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास गोठ्याच्या शेडवरून गेलेली उच्चदाब क्षमतेची वीजवाहक तारा तुटून गोठ्याच्या पत्र्यावर पडल्याने विजेचा धक्का बसून शेतकरी नानासाहेब वर्पे यांच्या 9 गाईंचा जागीच मृत्यू झाला. त्यांना राज्याचे माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राजहंस दूध संघाच्यावतीने आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

लनानासाहेब वर्पे यांच्या 9 गाईंचा मृत्यु झाल्याच्या घटनेची माहिती मिळताच राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी या कुटुंबाला भेट देऊन सांत्वन केले. या कुटुंबाला या आकस्मित घडलेल्या घटनेच्या धक्यातून सावरण्यासाठी आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राजहंस दूध संघाच्या .वतीने आर्थिक मदत देण्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. यावेळी गणपतराव सांगळे, मिननाथ वर्पे, शिवाजी जगताप, विलास कवडे, बंडोपंत वर्पे, बाळासाहेब राहणे, प्रकाश वर्पे, सीताराम वर्पे, छबूराव वर्पे, सोपानराव वर्पे, अशोक वर्पे, राजहंस दूध संघाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संजय भोसले व ग्रामस्थ उपस्थित होते.

नानासाहेब वर्पे यांचे कनोली येथील गट क्रमांक 353 मध्ये राहते घर व घराजवळच गोठ्याची शेड आहे. या इमारती वरून कनोलीची 11 के.व्ही. क्षमतेची वीज वाहिनी गेली आहे. शनिवारी पहाटे साडेचारच्या सुमारास स्फोटासारखा आवाज झाल्याने वर्पे कुटुंबीयांना जाग आली. त्यावेळी त्यांना गोठ्याच्या पत्र्यावर वीज वाहक तार पडल्याचे व त्यामुळे आसपासचे गवत व कपडे यांना आग लागल्याचे दिसले. गोठ्यात गाई बांधलेल्या होत्या. मात्र लोखंडी पत्रा, अ‍ॅगल, गव्हाणी, व गाईनच्या गळ्यातील लोखंडी साखळी मुळे गायीनचा जीव वाचविता आला नाही. त्यामुळे सर्वच नऊ गायींनाचा जागीच मृत्यू झाला. आधीच दुष्काळी परिस्थिती यात या कुटुंबाचा उदरनिर्वाह पुर्णत: दुग्धव्यवसायावर अवलंबून आहे. वर्पे कुटुंब अल्पभूधारक असल्याने या घडलेल्या घटनेमुळे हे कुटुंब हतबल झाले आहे.