Breaking News

स्वप्नील बोरुडे याचा सत्कार


अहमदनगर/प्रतिनिधी : दि. 17 जानेवारी ते 26 जानेवारी 2019 या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने, विद्यानगरी, सांताक्रूझ मुंबई येथे आयोजित राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन संचालनाचे आयोजन करण्यात येते. या संचालनात अहमदनगर कॉलेजच्या भूगोल विभागातील टीवायबीए चा स्वयंसेवक स्वप्नील चांगदेव बोरुडे याची निवड झाली होती. सावित्रीबाई फुले विद्यापीठातून 13 विद्यार्थ्यांची व नगर जिल्ह्यातून फक्त 3 विद्यार्थ्यांची संचालनासाठी निवड करण्यात आली होती.त्याच्या निवडीबद्दल नगर कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांनी अभिनंदन केले.

स्वप्नील बोरुडे याचा राष्टीय सेवा योजना विभाग, डॉ. माया उंडे, डॉ. शरद बोरुडे यांच्या वतीने प्राचार्य डॉ. आर.जे. बार्नबस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.