Breaking News

ओंड येथील अपघातात सहा जण जखमी


कराड (प्रतिनिधी) : कराड -चांदोली रोडवर जगदंबा पेट्रोल पंपासमोर ओंड गावच्या हद्दीत प्रवासी वाहतूक करणारी रिक्षा आणि इंडिका यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात सहाजण जखमी झाले आहेत. जखमी सर्व रिक्षामधील असून यामध्ये चार जणांची प्रकृती गंभीर आहे.

प्रवासी घेऊन जाणारी रिक्षा क्रमांक (एमएच 11 9837) ला समोरून कडे जाणारी इंडिका विस्टा गाडी क्रमांक (एमएच 10 बीडब्ल्यू 9834) जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षा झाडावर जाऊन आदळली, त्यामुळे रिक्षातील सहाजण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये राजेंद्र कांबळे (उंडाळे), जयश्री हनुमंत चव्हाण (वय35) चंद्रकांत वर्मा (वय24) अशी जखमींची नावे असून जखमींना कृष्णा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. अन्य जखमी नावे समजू शकली नाहीत. यावेळी अपघात झाल्यानंतर इंडिका गाडीतील पळून जाणार्‍यांना उंडाळे पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद करण्याचे काम चालू होते.