Breaking News

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षपदी हरिहर


कर्जत/प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथील राहुल हरिश्‍चंद्र हरिहर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड झाली. तालुकाध्यक्ष नितिन धांडे यांनी नुकतेच त्यांना निवडीचे पत्र दिले. त्यांच्या निवडीचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड, तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर आदींनी स्वागत केले.